Rajasthan CM : बाबा बालकनाथ यांची माघार; स्वतःच दिली माहिती! वसुंधराराजे पुन्हा ‘बॉस’?

Rajasthan CM : बाबा बालकनाथ यांची माघार; स्वतःच दिली माहिती! वसुंधराराजे पुन्हा ‘बॉस’?

Rajasthan CM : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपने (Election Results 2023) विजयाचा झेंडा फडकावला. या हिंदी पट्ट्यातील राज्यात मोदींची जादू चालली. भाजपनं मध्य प्रदेश तर राखलंच शिवाय छत्तीसगड आणि राजस्थानातून (Rajasthan CM) काँग्रेसला सत्तेतून बेदखल केलं. भाजपाच्या या प्रचंड यशानंतर आता राज्याची कमान कुणाच्या हाती द्यायची यावर भाजपात मंथन सुरू आहे. मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) आणि राजस्थानात वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांनाच मुख्यमंत्री करायचं की आणखी कुणाला संधी द्यायची याचा निर्णय अजून झालेला नाही. राजस्थानच्या मु्ख्यमंत्रीपदासाठी बाबा बालकनाथ यांचंही नाव घेतलं जात होता. पण, आता मात्र बाबा बालकनाथ (Baba Balaknath) यांनी भूमिका स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

बाबा बालकनाथ यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे, की पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा खासदार आणि नंतर आमदार होण्याची संधी मिळाली. आता प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियात ज्या काही चर्चा सुरू आहेत त्याकडे दुर्लक्ष करा. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी अनुभव मिळवायचा आहे.

Rajasthan NEW CM : CM पदासाठी तब्बल 9 जणांमध्ये रस्सीखेच; कोण आहेत 9 चेहरे? LetsUpp Marathi

बाबा बालकनाथ 2019 मध्ये भाजपाच्या तिकिटावर अलवर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. पक्षाने यावेळी त्यांना तिजारा विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. बालकनाथ यांनी काँग्रेस उमेदवार इमरान खान यांचा पराभव करत आमदारकीची निवडणूक जिंकली. यानंतर त्यांनी आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला. ते आता राज्याच्या राजकारणात दिसतील.

निवडणुक निकाल लागून सहा दिवस उलटून गेले तरी सुद्धा राजस्थानचा मुख्यमंत्री कोण असेल हे भाजपला ठरवता आलेलं नाही. बाबा बालकनाथ पुढील मुख्यमंत्री असतील अशी चर्चा जोरात सुरू होती. त्यांना मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदारही मानले जात होते. मात्र आजच्या त्यांच्या ट्विटवरून असं दिसून येत आहे की भाजपनं त्यांच्यासाठी वेगळाच प्लॅन तयार केला आहे. बालकनाथ यांच्या व्यतिरिक्त वसुंधरा राजे, किरोडी लाल मीणा, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दीया कुमारी यांची नावं चर्चेत आहेत.

Chhattisgarh Election : भाजप जिंकला तर छत्तीसगडचा CM कोण? ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या नाथ संप्रदायाचे प्रमुख आहेत त्याच संप्रदायातून बाबा बालकनाथही येतात. बालकनाथ रोहतक येथील मस्तनाथ मठाचे महंत आहेत. 29 जुलै 2016 रोजी महंत चांदनाथ यांनी एका समारंभात बालकनाथ यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले होते. त्यांचे समर्थक त्यांना राजस्थान का योग या नावाने संबोधतात.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज