Download App

धक्कादायक! अहमदनगरमध्ये चक्क घरात आढळले बॉम्ब व दारुगोळा, एक जण ताब्यात

Ahmednagar Weapons : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हत्या, धार्मिक दंगली आणि शस्त्रास बाळगणे असे गुन्हे सर्रास घडत आहेत. त्यात आता पुन्हा मोठा शस्त्रसाठा सापडला पाहायला मिळालं आहे. लष्करात युद्धासाठी वापरण्यात येणार दारुगोळा व बॉम्ब एका व्यक्तीच्या घरात आढळून आले असल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील खारेकर्जुने शिवारात घडली आहे. ( Weapons in House in Ahmednagar crime )

Swanandi Tikekarच्या हातावर रंगली साखरपुड्याची मेहंदी; फोटो शेअर करत म्हणाली, “आम्हाला जे…” 

पोलिसांनी छापा टाकला असता एक दोन नव्हे तर चक्क 50 जीवंत आणि मृत बॉम्ब तसेच तोफ गोळ्यासाठी वापरली जाणारी 25 किलो टीएनटी पावडर देखील मिळून आली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस, दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) व आर्मी इंटेलिजन्स ब्युरो यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी दिनकर त्रिंबक शेळके याला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Nagraj Manjuleचा’ नवीन सिनेमा; बाप- लेकाची हलकीफुलकी कहाणी असलेला ‘बापल्योक’

याबाबत अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली कि खारेकर्जुने शिवारात एका व्यक्तीच्या घरामध्ये लष्करात वापरले जाणारे साहित्य आहे. यामध्ये स्फोटके देखील असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस, दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) व आर्मी इंटेलिजन्स ब्युरो यांच्या संयुक्त पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस पथकाने शेळके याच्या घरावर छापा टाकला. यावेळी त्यांनी घराची झाडाझडती घेतली असता त्यांना घरासमोरील पडवी आणि भिंती लगत स्फोटक व दारुगोळा, जीवंत आणि मृत बॉम्ब आढळून आले. यामध्ये सुमारे 50 जीवंत आणि मृत बॉम्ब, तोफ गोळ्यासाठी वापरली जाणारी 25 किलो टीएनटी पावडर मिळून आली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान पोलिसांनी तातडीने हे सर्व साहित्य ताब्यात घेत जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिनकर त्रिंबक शेळके याला ताब्यात घेतले असले रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील शेळके यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात लष्कराचा दारुगोळा व स्फोटकांचा साठा कसा व कोठून आला. तसेच याचा तो कोठे उपयोग करणार होता का? याबाबतची माहिती पोलिसांसह आर्मी इंटेलिजन्स ब्युरो घेत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Tags

follow us