Nagraj Manjuleचा’ नवीन सिनेमा; बाप- लेकाची हलकीफुलकी कहाणी असलेला ‘बापल्योक’
Nagraj Manjule New Movie Baplyok: दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) मनोरंजन क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असतात. त्यांनी सतत त्यांच्या सिनेमात गावाकडील कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक मोठा ठसा उमटवला आहे. परंतु आता लवकरच नागराज मंजुळेंचा एक नवा सिनेमा (New Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बापल्योक’ (Baplyok Marathi Movie) असे या मराठी सिनेमाचे नाव आहे.
View this post on Instagram
‘बापल्योक’ या सिनेमामध्ये बाप लेकाची एक हलकाफुलका प्रवास पाहायला मिळणार आहे. या सिनेमाद्वारे बाप आणि लेकाचा भावनिक विषय मोठ्या पडद्यावर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. नुकतंच या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
नागराज मंजुळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केले आहे. त्यामध्ये त्यांनी एक चौकनी कुटुंब बघायला मिळणार आहे. यामध्ये एक मुलगा, त्याचे वडील, आई आणि बहिण बघायला मिळत आहे. यामध्ये ते सर्वजण त्या मुलाकडे कौतुकाने बघत असल्याचे बघत असल्याचे दिसून येत आहे.
सिनेमाबद्दल बोलत असताना नागराज या नि सांगितले आहे की, सरणारी वर्षं आणि वाढणारा सहवास यांच्या साथीने नाती मुरत जात असतात. अर्थात या नात्यात एक सूर गवसला आहे तर आयुष्याचा प्रवास सुफळ संपूर्ण होतो. आजवर बाप लेकाचा प्रवास तेवढ्या ताकदीने सिनेमातून मांडला गेला नाही. मकरंद याला हा प्रवास मांडावासा वाटल्याचे सांगितले आहे. ही गोष्ट मला भावली आणि मी सिनेमासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
Swanandi Tikekarचा’ होणारा नवरा कोण आहे? जाणून घ्या आशिष कुलकर्णीबद्दल…
या सिनेमाचे दिग्दर्शक मकरंद माने यांनी केले आहे. तर ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या सिनेमाची निर्मिती केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. नागराज मंजुळे हे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘बापल्योक’ या सिनेमाची कथा विठ्ठल नागनाथ काळे यांनी लिहिली आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने आणि विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. येत्या २५ ऑगस्टला हा सिनेमा चाहत्यांना पाहायला मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.