Swanandi Tikekarचा’ होणारा नवरा कोण आहे? जाणून घ्या आशिष कुलकर्णीबद्दल…
Swanandi Tikekar Ashish Kulkarni : अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) सध्या जोरदार चर्चेत आली आहे. स्वानंदीने ‘आमचं ठरलं’ असं म्हणत सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून आपल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे. स्वानंदी लवकरच आशिष कुलकर्णीबरोबर (Ashish Kulkarni) लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले आहे.
View this post on Instagram
स्वानंदीने आशिषबरोबरच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामुळे तिचा बॉयफ्रेंड आणि होणारा नवरा कोण आहे? हे जाणून घेण्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली होती. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil Dosti Duniyadari) या सिरीयलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचलेली एक उत्तम जोडी आहे. स्वानंदीचे वडील उदय टिकेकर हे मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आणि तिची आई आरती अंकलीकर टिकेकर या देखील एक गायिका आहेत.
स्वानंदीच्या बॉयफ्रेंड म्हणजेच होणाऱ्या नवऱ्याचे नाव आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) आहे. गेल्या एक वर्षापासून स्वानंदी आणि आशिष एकमेकांना चांगलच ओळखत असल्याचे चाहत्यांना दिसून आले आहे. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमामध्ये झाले आहे. आता लवकरच ते बोलल्यावर चढणार असल्याचे सांगितले जात आहे. स्वानंदी अभिनेत्री असण्याबरोबरच एक उत्तम गायिका आहे. तसेच आशिषदेखील इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय गायक आहेत.
तसेच ‘इंडियन आयडॉल १२’च्या (Indian Idol 12) माध्यमातून त्याने चाहत्यांचे कायम मनोरंजन करत असताना दिसून येत असतो. आशिष हा पुणेकर असून त्याचं स्वत:चं युट्यूब चॅनल देखील असल्याचे समोर आले आहे. ‘इंडियन आयडॉल १२’च्या माध्यमातून आशिषला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. या मंचाने त्याला एका रात्रीत सुपरस्टार केले आहे. जगभरातून प्रेक्षकांचे नेहमी प्रेम मिळाले आहे. आशिष गायक असण्याबरोबर उत्तम गीतकार देखील आहे.
Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…
अनेक मराठी सिनेमांसाठी आशिषने गाणी गायली आहेत. आणि त्याचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहतावर्ग असल्याचे दिसून येते. स्वानंदी-आशिषच्या लग्नाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. स्वानंदी आणि आशिषने प्रेमाची जाहीर कबुली दिल्यावर ते लग्नबंधनामध्ये कधी अडकणार याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. त्यांच्या सोशल मीडियावर देखील पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तसेच केळवणासाठी त्यांना आमंत्रण देखील मिळायला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.