Swanandi Tikekarच्या हातावर रंगली साखरपुड्याची मेहंदी; फोटो शेअर करत म्हणाली, “आम्हाला जे…” 

Swanandi Tikekarच्या हातावर रंगली साखरपुड्याची मेहंदी; फोटो शेअर करत म्हणाली, “आम्हाला जे…” 

Swanandi Tikekar Ashish Kulkarni Engagement : गायिका स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) हे दोघे लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार असल्याचे दिसून येत आहे. स्वानंदी आणि आशिषने सोशल मीडियावर आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. आता साखरपुड्याच्या तयारीचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का दिल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)


स्वानंदीने सोशल मीडियावर आशिष कुलकर्णीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत स्वानंदीच्या हातावर मेहंदी रंगल्याचे दिसून येत आहे. तसेच ती होणारा पती आशिषच्या गालावर किस करत असताना दिसून आली आहे. तसेच या फोटोत स्वानंदी आणि आशिषने ट्रडिशनल आऊटफिट घातल्याचे दिसत आहे. रोमॅंटिक फोटो शेअर करत स्वानंदीने कॅप्शनमध्ये सांगितले आहे की,”आम्हाला जे हवं होतं तेच…”. तसेच #EngagementMehendi #SwanandiAshish असे हॅशटॅग देखील तिने यावेळी वापरल्याचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)


स्वानंदीने 20 जुलैला सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्यांच्या दोघांमधील नात्याची कबुली दिली होती. ‘आमचं ठरलं’ असं म्हणत तिने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली होती. तेव्हापासून चाहते तिच्या लग्नाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसून आले आहेत. आता स्वानंदीचा साखरपुडा होत असल्याने चाहते देखील तिच्या आनंदात सहभागी झाल्याचे दिसून आले आहेत.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil Dosti Duniyadari) या सिरीयलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचलेली एक उत्तम जोडी आहे. तसेच ‘इंडियन आयडॉल १२’च्या (Indian Idol 12) माध्यमातून त्याने चाहत्यांचे कायम मनोरंजन करत असताना दिसून येत असतो. आशिष हा पुणेकर असून त्याचं स्वत:चं युट्यूब चॅनल देखील असल्याचे समोर आले आहे. ‘इंडियन आयडॉल १२’च्या माध्यमातून आशिषला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. या मंचाने त्याला एका रात्रीत सुपरस्टार केले आहे. जगभरातून प्रेक्षकांचे नेहमी प्रेम मिळाले आहे. आशिष गायक असण्याबरोबर उत्तम गीतकार देखील आहे.

Swanandi Tikekarचा’ होणारा नवरा कोण आहे? जाणून घ्या आशिष कुलकर्णीबद्दल…

तसेच त्याचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहतावर्ग असल्याचे दिसून येते. स्वानंदी-आशिषच्या लग्नाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. स्वानंदी आणि आशिषने प्रेमाची जाहीर कबुली दिल्यावर ते लग्नबंधनामध्ये कधी अडकणार याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. त्यांच्या सोशल मीडियावर देखील पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube