Sujay Vikhe : गेल्या काही दिवसांपासून नगर लोकसभेसाठी (Ahmednagar Loksabha) वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरु आहे. भाजपकडून खासदार सुजय विखे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार फायनल झालेला नाही. त्यामुळे विखेंविरोधात कोण याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. संदर्भात खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले की उमेदवार सर्व क्षेत्रातील जाण आणि अभ्यासू असलेल्या व्यक्तींच साथ द्या. कोण चर्चेत आहे, यापेक्षा मला जनतेसाठी कसं चांगलं काम करता येईल याकडे लक्ष आहे, असे त्यांनी म्हटले.
लोकसभेची निवडणूक अजून लांब आहे. कोण विरोधक आहे याचीही आपल्याला कल्पना नाही. कोण चर्चेत आहे, यापेक्षा मला जनतेसाठी कसं चांगलं काम करता येईल याकडे मी जास्त लक्ष देतो. “जय श्रीराम” असे उत्तर देत जनतेच्या आशीर्वादावरच सर्व काही शक्य आहे. जनतेसाठी प्रामाणिक काम करत राहायचं, जनता साथ देत राहते, असे खासदार सुजय विखे यांनी म्हटले.
काष्टी येथे ते विविध विकास कामांचा कार्यक्रमाप्रसंगी विखे बोलत होते. जो व्यक्ती सुशिक्षित असेल व सर्व क्षेत्रातील ज्याला जाण असेल अशा हुशार आणि अभ्यासू व्यक्तींनाच येणाऱ्या निवडणुकांमध्ये साथ द्या. त्यामुळे समाजाची प्रगती होईल व समाज पुढे जाईल, असे आवाहनही सुजय विखेंनी केले.
जाहीर पाठिंबा देतो, नार्वेकरांना हाकला; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान
पुढे खासदार विखे म्हणाले की, ज्येष्ठ आमदार बबन पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यासाठी मागील पाच ते सहा महिन्यांमध्ये रस्त्यांसाठी दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आणला. या वयातही इतक्या तत्परतेने तालुक्यात जनतेसाठी काम करणारा नेता पाहिला नाही. पाचपुते यांची जिद्द, चिकाटी व काम करण्याची पद्धत ही वेगळीच आहे.
‘माझं कुठं चुकलं हे ठाकरेंनी दाखवलंच नाही’; हातात SC चा निकाल घेत नार्वेकरांचं चोख प्रत्युत्तर
यासोबतच 22 जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गावातील सर्व मंदिरांची स्वच्छता, सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई करावी. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची सकाळी प्रभातफेरी काढून रामनामाचा जयघोष करावा. तसेच सर्व घरांवर गुढ्या उभारून भगवे ध्वज फडकवावेत व दिवे लावावेत आणि महिला मंडळाच्या माध्यमातून सामूहिक रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्याचे आवाहन खासदार सुजय विखेंनी जनतेला केले.