Download App

NCP Political Crises: भाजप-अजित पवार एकत्र, एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या विखे-लंकेंपैकी आगामी लोकसभेला कोणाची वर्णी लागणार?

Nilesh Lanke vs Sujay Vikhe : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत पुन्हा एकदा बंड पुकारत काही आमदारांनासोबत घेत थेट राजभवन गाठले व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यातील काही आमदार हे अजित पावबर यांच्यासोबत आहेत तर काही आमदार हे शरद पवार यांच्यासोबत आहे. या बंडामुळे काही इच्छुक उमेदवारांचे आगामी निवडणुकांचे गणित बिघडणार अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. लोकसभेसाठी आमदार निलेश लंके यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र आता राष्ट्रवादीने शिंदे – फडणवीस सरकारशी हातमिळवणी केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुजय विखे व निलेश लंके यापैकी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ( Who will be fought for Loksabha 2024 Nilesh Lanke OR Sujay Vikhe During Ajit Pawar Rebellion Ncp Political Crisis )

Sujay Vikhe Patil : राऊत, शिवसेना-राष्ट्रवादी नंतर आता काँग्रेस फोडण्यास मदत करा; विखेंचा टोला

नगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. यामध्ये विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नगर जिल्ह्यावर सर्वाधिक लक्ष असते. मात्र, रविवारीच्या नाट्यमय घडामोडीनंतर अनेक राजकीय गणित हि बिघडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहापैकी चार आमदार यामध्ये निलेश लंके, संग्राम जगताप, किरण लहामटे, तसेच आशुतोष काळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले असल्याचे समजते. तर पवार यांचे नातू कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार व प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या गटात राहिले आहे.

‘Namak Halal’ फेम अभिनेता हरिश मॅगन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन

अजित पवार यांच्या शपथविधीला पारनरेच आमदार नीलेश लंके, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. दरम्यान यावेळी शपथविधीस उपस्थित असलेले लंके यांनी यावर भाष्य करणे टाळले होते. मात्र त्यांची उपस्थितीत ही अजित पवारांच्या गटात सामील झाल्याचे दर्शवित होते.

शिंदेंचे मुख्यमंत्रीपद धोक्यात? अजितदादांना भाजपचा शब्द; पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ

दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीवरून जिल्ह्यात विखे विरुद्ध लंके असा सामना पाहायला मिळणार असे चित्र आतापर्यंत होते. नुकतेच नगर जिल्हाधिकारी कार्यालयात विखे-लंके आमने सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी देखील झाली. यावेळी दोघांनी एकमेकांवर टीका टिपण्णी देखील केली. मात्र आता राष्ट्रवादीने आता सेना-भाजपशी हातमिळवणी करत सत्तेत सहभागी झाले आहे. यामुळे भविष्यात लोकसभेसाठी लंके विरुद्ध विखे अशी लढत हॉल अशी शक्यता मावळू शकते. दरम्यान लंकेनी शरद पवारांची साथ सोडली आहे. त्यामुळे आता विखे आणि त्यांच्यातील संबंध भविष्यात कसे राहणार? याचीही उत्सुकता आहे.

Tags

follow us