‘Namak Halal’ फेम अभिनेता हरिश मॅगन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन

‘Namak Halal’ फेम अभिनेता हरिश मॅगन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन

Harish Magon Dies: बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ अभिनेते हरिश मॅगन (Harish Magon Passes Away) यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्याचे १ जुलै रोजी निधन झाले आहे. हरिश मॅगन यांच्या पश्चात बायको पूजा, मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी आरुषी असा छोटासा परिवार आहे.

हरीश मॅगन यांची एक अॅक्टिंग खूपच रंजक असायची. तसेच त्यांच्या इंस्टीट्यूटचे नाव त्यांच्याच नावावर होते. ही इंस्टीट्यूट मुंबईच्या जुहू भागामध्ये आहे. तसेच ते रोशन तनेजाच्या अॅक्टिंग स्कूलचे इंस्ट्रक्टर देखील होते. हरीश यांच्या निधनाची बातमी CINTAA नं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी हरीश मॅगन यांच्या निधनाची बातमी देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ही पोस्ट शेअर करत असताना त्यांनी सांगितले आहे की, “CINTAA हरीश मैगन यांच्या निधनावर आमची संवेदना व्यक्त करत आहोत.

त्यावर एका चाहत्यांनी कमेंट करत १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘आंधी’ या सिनेमातील गाण्यातील हरीश यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांने सांगितले आहे की, हरीश हे भारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थानातून ग्रॅज्युएट झालेले पहिले व्यक्ती आहेत, आणि गुलजार यांच्या सहायकाचे अतिशय जवळीक असलेले मित्र होते. ९०च्या दशकातील अनेक हिट सिनेमामध्ये हरिश मॅगन यांनी सहाय्यक भूमिकेमध्ये काम करणाऱ्या उल्लेखनीय अभिनेत्यांमध्ये त्यांचे नाव नेहमीच प्रथम स्थानी होते.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

हरीश मॅगन यांनी एफटीआयआय (FTII) मधून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी ‘चुपके चुपके’, ‘खुशबू’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘शहेनशाह’ यांसारख्या सुपरहिट सिनेमामध्येही आपली कला दाखवली आहे. ‘उफ़! ये मोहब्बत’ हा १९९७ मध्ये आलेला त्यांचा शेवटचा सिनेमा होता. काही कारणांमुळे त्यांनी अभिनय करत असल्याचे पुन्हा दिसून आले नाहीत. परंतु ते मुंबईतील जुहू इथं हरीश मॅगन अॅक्टिंग इन्स्टिट्यूट चालवत असायचे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube