Download App

नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवणार का? बाळासाहेब थोरातांनीच दिले उत्तर

Balasaheb Thorat: राज्यात येत्या काळात आगामी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने राजकीय हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. यात नगर दक्षिण लोकसभेचा (Nagar Lok Sabha) देखील समावेश आहे. सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे लोकसभा निवडणूक लढवणार का यावर खुद्द थोरात यांनीच आता उत्तर दिले आहे. आम्ही सध्या महाविकास आघाडीत आहोत यामुळे तीनही पक्षांनी विचार करून कोणाच्या वाटेला ही जागा जाणार हे आम्ही ठरवू. त्यामुळे यावर आत्ताच बोलणं नाही अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेस विधीमंडळ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी निवडणुकीवर देखील महत्त्वाचे वक्तव्य केले. लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असताना बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. दरम्यान थोरात यांना पत्रकार परिषदेत आपण लोकसभा निवडणूक लढणार का अशी विचारण्यात पत्रकारांकडून करण्यात आली होती. यानंतर थोरातांनी प्रतिक्रिया दिली.

‘धोरण आखले आहे’! दसऱ्याच्या मुहुर्तावर सीमोल्लंघन करत शिंदे सरकार देणार जरांगेंना मोठं गिफ्ट?

बोलताना थोरात म्हणाले की महाविकास आघाडीत आहोत. तीन पक्ष महाविकास आघाडीत असून आम्ही एकत्र येऊन ही जागा कोणाला दिली जाईल यावर निर्णय घेऊ. या विषयावरती बोलणं उचित ठरणार नाही, असं थोरात म्हणाले.

जर चौथी आत्महत्या झाली तर सरकारवर एफआयआर दाखल करा, संजय राऊतांचा हल्लाबोल

मात्र राष्ट्रवादीकडून नगर दक्षिण लोकसभा जागा आम्हीच लढवणार असा दावा केला जातो आहे. यावर थोरात त्यांनी प्रतिक्रिया दिली. थोरात म्हणाले की नगर दक्षिणेची जागा ही राष्ट्रवादीकडे होतीच म्हणून ते म्हणत असतील. अनेक गोष्टी पुढे येतील लवकरच 48 जागांबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर यावरती बोलणं योग्य ठरेल, असे सूचक वक्तव्य यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

Tags

follow us