उद्धव आणि राज साहेब एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या मनातील आग बाहेर आली आहे. (Nashik) दोघे एकत्र आल्याने त्यांनी जनतेला त्यांच्या मनातील संतापला वाट मोकळी करण्याची संधी दिली आहे असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक येथील सभेत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरात धर्मध्वजा फडकवली, त्या धर्मध्वजावरही झाडाचे चित्र आहे. परंतू नाशिकमध्ये बिल्डरच्यासोयीसाठी झाडांची कत्तल केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या सभेत मशाली पेटल्या आहेत. इंजिन पुढे निघालं आहे. या इंजिनाला आणि मशालीला ऊर्जा देण्याचं काम या मैदानातील लाखो मराठी बांधव, शिवसैनिक आणि मनसैनिक. अभिमान बाळगावा अशी ही सभा आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या संयुक्त सभेसाठी नाशिकची निवड केली. यातच नाशिकचं महत्त्व कळलं असेल. दोघांनी एकत्र येणं ही राजकीय घडामोड नाही तर महाराष्ट्रातील मनातील आग बाहेर पडण्याचा हा क्षण आहे. ही आग आहे. ही आग आता बाहेर काढण्याची संधी मिळाली आहे असेही राऊत यावेळी म्हणाले.
नाशिकचे प्रश्न महाराष्ट्राचे आहेत. कुंभ नगरी, लवकर येथे कुंभ मेळा होईल. कुंभाच्या निमित्ताने नाशकात भ्रष्टाचार माजला आहे, तो हिंदुत्ववाद्यांना शोभणारा नाही. कुंभाच्या निमित्ताने ५० हजार कोटींची कामे निघाली आहे. महाराष्ट्रातील बाहेरच्या खासकरून गुजरातच्या कंत्राटदारांना कामे मिळाली आहे. महाराष्ट्रातील लोकांनी काय करायचं. गिरीश महाजन नावाचा पालकमंत्री गुजरातच्या ठेकेदाराला देतो. कुणाला कोणतं काम द्यायचं याची यादी दिल्लीतून आली आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
नाशिकला जी आश्वासने मिळाली होती आता ती सर्व फोल ठरली आहेत. पंतप्रधा्न नरेंद्र मोदी हे स्मार्ट सिटी करणार होते. १०० शहरं काढली त्यात नाशिकचाही समावेश होता. . ३१ डिसेंबर २०२५पर्यंत स्मार्ट सिटीचे काम पूर्ण होणार होते. पण आजही नाशिकची अवस्था पाटणा आणि बिहारसारखी झाली असल्याचे संजय राऊत म्हणाले. नाशिक येथे पाच- पाच दिवस नाशिकला पाणी मिळत नाही. नाशिकचे खासगीकरण करण्याचे काम सुरू आहे. फडणवीस यांनी नाशिक शहराला दत्तक घेतले होते. परंतू सावत्रभावापेक्षा वाईट अवस्था त्याने केली असंही ते म्हणाले.
