नाशिक भाजपमध्ये राडा, एबी फॉर्मसाठी थेट शहराध्यक्षांच्या वाहनाचा पाठलाग अन्…
Nashik Municipal Corporation Election : राज्यात होत असलेल्या 29 महानगर पालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा
Nashik Municipal Corporation Election : राज्यात होत असलेल्या 29 महानगर पालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असून इच्छुक उमेदवारांची धावपड होताना दिसत आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये तिकीट वाटपावरुन भाजपमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. भाजप कार्यालयात परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, भाजपला पोलीस बंदोबस्तात एबी फॉर्मचे वाटप करावे लागत आहे. तिकीटांचा काळाबाजार सुरु असल्याचा आरोप काही भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी केल्याने नाशिकच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये (BJP) निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याने निष्ठावंतांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या वाहनाचा इच्छुक उमेदवारांकडून पाठलाग करण्यात आला होता. पंचवटी आणि नवीन सिडको परिसरातील इच्छुक उमेदवार या पाठलाग सहभागी होते अशी माहिती समोर आली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इच्छुकांकडून एबी फॉर्मसाठी पाठलाग होत असल्याने भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये तिकीट वाटपाचा कार्यक्रम सुरु करण्यात आले तसेच कार्यालया ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
इच्छुकांचा गंभीर आरोप
तर दुसरीकडे नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये तिकिटाचा काळाबाजार होत असल्याचा आरोप काही इच्छुकांकडून करण्यात आल्याने सध्या नाशिकमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे. नाशिक महापालिकेसाठी भाजपने स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर भाजपच्या तिकिटासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांची नाराजी भाजप कशी दूर करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
T20 World Cup 2026 साठी इंग्लंडचा ‘तात्पुरता’ संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना संधी
