ठाकरे गटाकडून हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी, मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा पुन्हा वार

ठाकरे गटाकडून हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी, मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव घेत राऊतांचा पुन्हा वार

Sanjay Raut : महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी भाषा विषय शिकवला जाण्याच्या आणि त्रिभाषा सूत्र लागू केल जात आहे. मात्र, त्याला राज्यात कडाडून विरोध केला जात आहे. सरकारच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. (Raut) ठाकरे गटाने तर काहीही झालं तरी हिंदी भाषासक्ती होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतलाय.

ठाकरे गट येत्या 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काढलेल्या शासन निर्णयाची होळी करणार आहे. तसंच, येत्या 5 जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढला जाणार आहे. असं असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून मोठी माहिती दिली आहे. खासदार संजय राऊत यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हिंदीसक्तीच्या धोरणाला कडाडून विरोध केला आहे.

उद्या निर्णायक बैठक! आंतरवालीत खलबतं, जरांगेच्या मुंबई मोर्चाचा रूट ठरणार

येत्या 29 जून आणि 5 जुलै रोजी नेमका कशा पद्धतीने सरकारच्या या धोरणाला विरोध केला जाईल, याची माहिती दिली आहे.मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवुया असं म्हणत राऊत यांनी हिंदीसक्तीचा मोर्चा आणि शासन निर्णयाच्या होळी करण्याच्या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे. हिंदी सक्तीचा सरकारी निर्णय,फडणवीसी आदेशाची होळी करण्याच्या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहतील.

29 जून रोजी रविवारी 3 वाजता ही होळी आझाद मैदानावर आयोजित करण्यात येईल. तसंच, येत्या ५ जुलै रोजी मराठी एकजूट मोर्चाच्या तयारीसाठी शाखा प्रमुखांची एक बैठक होईल. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. 29 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता शिवसेना भवन येथे ही बैठक होणार आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. तसंच, राऊतांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी हिंदीसक्तीच्या सरकारी निर्णयाची होळी करूया. मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवुया, असंही राऊत म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube