Download App

रामराजे निंबाळकर यांना चौकशीसाठी नोटीस; मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणाच कनेक्शन काय?

सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेला १ कोटीच्या खंडणीचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या

Ramraje Nimbalkar Audio Clip : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खंडणी आणि बदनामी प्रकरणात वडूज पोलिसांनी माजी विधानसभा परिषद सभापती तथा विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांना चौकशीसाठी शनिवारी (३ मे) सकाळी ११ वाजता हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Audio) रामराजे निंबाळकर चौकशीला हजर राहणार का? याकडं सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून आहे.

शरद पवार पक्षाच्या नेत्यांवर आरोप

मंत्री जयकुमार गोरे संदर्भातील खंडणी आणि बदनामी प्रकरणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सहभागी असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यापैकी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आणि विधानसभा निवडणुकीतील शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे पराभूत उमेदवार प्रभाकर घार्गे यांना चौकशीसाठी शुक्रवारी (२ मे) वडूज पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस वडूज पोलिसांनी बजावली होती. मात्र, देशमुख आणि घार्गे हे पोलीस ठाण्यात हजर राहिलेले नाहीत.

“बीडसारखाच माझ्याविरोधात कटाचा प्रयत्न पण मी.. मंत्री जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट

सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेला १ कोटीच्या खंडणीचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एका महिलेसह युट्यूट चॅनेलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने आता आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना शनिवारी (३ मे) हजर राहण्यास नोटीसीद्वारे कळवण्यात आलय.

रामराजे होते लॉ कॉलेजचे प्राचार्य 

विधान परिषदेचे माजी सभापती आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार रामराजे नाईक-निंबाळकर हे निष्णात कायदेतज्ज्ञ आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या लॉ कॉलेजचे ते प्राचार्य होते. कायद्याचे चांगले जाणकार असल्यानं रामराजे पोलीस चौकशीला सामोरे गेल्यानंतर ते पोलिसांचाच उलटतपास घेणार का? याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून आहे.

follow us