Download App

आता जिल्हा परिषद शाळेतच अंगणवाडी भरणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

आता जिल्हा परिषद शाळेतील वर्गात अंगणवाडी भरवली जाणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी भाडेतत्वावरील खोल्यांमध्येच सुरु आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील मोकळ्या खोल्या अंगणवाडीच्या बालकांसाठी वापरण्याचं धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

दादांना सोबत घेतल्याचा भाजपला फायदा होईल का? विजय वडेट्टीवारांचं स्पष्टच सांगितलं…

अजित पवार म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागात 94 हजार 886 तर नागरी भागात 15 हजार 600 अशा एकूण 1 लाख 10 हजार 48 अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी 21 हजार 969 अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत भरतात. तसेच इतर 9060 अंगणवाड्या समाज मंदिर, वाचनालयाच्या इमारतीत भरतात.

Udhav Thackery यांच्या स्टेजवर 2024 पर्यंत चार-पाचच लोक दिसतील; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला

मुलांना आनंददायी शिक्षण मिळण्यासाठी त्यांना पुरेशी जागा व इतर सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमध्ये मोकळ्या राहणाऱ्या वर्गखोल्या अंगणवाडीच्या मुलांसाठी वापरता येऊ शकतात, त्यादृष्टीने ग्रामविकास विभागामार्फत धोरण तयार करावे. तसेच शहरांमधील अंगणवाड्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत निधी देण्याबाबत उचित कार्यवाही करावी, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, महिला व बाल विकास विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीस महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोगाच्या सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

Tags

follow us