Download App

जरांगेंकडून उपोषणाच्या नावाखाली समाजाला वेड्यात काढण्याचं काम सुरू; नवनाथ वाघमारेंची टीका

जरांगे आता पागल, वेडा झालाय, त्याला लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार, अशी टीका नवनाथ वाघमारेंनी जरांगेवर टीका केली.

  • Written By: Last Updated:

Navnath Waghmare On Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आता आपल्या आंदोलनाची स्टाइल काहीशी बदलली आहे. ते आता मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवाली सराटी येथे १५ फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहे. यावर आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी भाष्य केलं. मनोज जरांगे कोणते आंदोलन करणार आहेत आता, उपोषणचं पुन्हा, जर आंदोलन, उपोषण करायचे होते तर सोडलंच का? असा सवाल वाघमारे यांनी केला. तसेच जरांगे उपोषणाच्या नावाखाली समाजाला वेड्यात काढताहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

“सत्याचा विचार घेऊनच राजकारणात या”, कन्हैय्या कुमारचे तरुणांना आवाहन 

जरांगे आता पागल, वेडा झालाय, त्याला लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार, असंही वाघमारे म्हणाले.

जरांगे वेडा झालाय…
नवनाथ वाघमारे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. जरांगे आता पागल, वेडा झालाय, जरांगेला प्रसिद्धी मिळत नाही त्यामुळे त्याची झोप उडालेली आहे. जरांगेला लवकरच मेटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार आहे. जरांगे मेंटल हॉस्पिटलला ऍडमिट झालेला महाराष्ट्राला दिसेल, असेही वाघमारे यांनी म्हटलंय.

उपोषणाच्या नावाखाली पैसे गोळा केले
पुढं ते म्हणाले, जरांगेला प्रसिद्धी आणि पैसा याशिवाय झोप येत नाही. उपोषणाच्या नावाखाली पैसा गोळा करण्याचे काम जरागेचं असतंय असा थेट आरोपही वाघमारे यांनी केला.

जरांगेकडून समाजाला वेड्यात काढायचं काम…
जरांगे हे उपोषणाच्या नावाखाली समाजाला वेड्यात काढायचं आणि राज्य सरकारला वेठीस धरायचं काम करतात. जरांगेच्या मागे आता कोणीही राहिले नसल्याचं राज्य सरकारला माहित झालंय. त्यामुळे जरांगेच अस्तित्व संपलेलं आहे. आता सरकारही जरांगेला घाबरत नाही, असंही वाघमारे म्हणाले.

मराठा समाजाचा नेता सुरेश धस
ते म्हणाले, खरंतर मराठा समाजाचा नेता सुरेश धस झालेला आहे, त्यामुळे जरांगेला कोणीही जुमानत नाही. जरांगेला राज्य सरकार कोलतंय, जरांगेचं काहीही राहिलेलं नसून आता नोंटकी सुरू आहे, असंही वाघमारे म्हणाले.

follow us