215th birth anniversary of Louis Braille : ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांची (Louis Braille) 215 वी जयंती आहे. यानिमित्ताने अहिल्यानगर (Ahilyanagar News) शहरात अनामप्रेम संस्थेकडून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. ही कार्यशाळा 4 ते 5 जानेवारी रोजी अंध व्यक्तींसाठी निवासी स्वयंचलन कार्यशाळा आणि अपंगाच्या कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन (workshop for blind People) करण्यात आलेलं आहे.
प्रवाशांचा वेळ वाचणार; अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता…
अहिल्यानगर येथील गांधी मैदानात अनामप्रेम संस्थेकडून ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त अंधजनांसाठी स्वयंचलन मन:शांती, ध्येय निश्चिती आणि अपंगांच्या कायदे विषयक कार्यशाळा 4 आणि 5 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलंय. या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये पुण्यातील एस.पी. कॉलेजमधील प्राध्यापिका योगिता काळे मार्गदर्शन करणार आहेत.
प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, बीडमधील मोर्चा म्हणजे शिमगा…, गुणरत्न सदावर्तेंची टीका
अहिल्यानगर जिल्ह्यातील 6 ते 35 वयोगटातील सर्व अंध बांधवांना याचा उपयोग होणार आहे. अहिल्यानगर शहरापासून 10 कि.मी. अंतरावरील अनामप्रेम – सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प, निंबळक येथे हि मोबिलिटी कार्यशाळा सकाळी 10 ते 5 यावेळेत होणार आहे. यासोबतच राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे विद्यमान उपाध्यक्ष रघुनाथ बारड हे अपंगांच्या कायदे संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्वांसाठी चहा, नाष्टा,भोजन,निवास आणि वाहन व्यवस्था ही संस्थेतर्फे मोफत करण्यात आलेली आहे.
जन्मत: अंध किंवा कालांतराने अंधत्व आलेल्या 6 ते 35 या वयोगटातील व्यक्तींना चालण्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. अंधत्वामुळे मानसिक आणि शारीरिक पातळीवर त्याचा परीणाम होतो. त्यामुळे अशावेळी अंधत्वावर मात करून रोजच्या कामात कशी सुलभता आणावी यावर या कार्यशाळेत मा.प्रा.योगिता काळे प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यशाळेत अंध मुली आणि महिलांसाठी एक विशेष सत्र घेण्यात येणार आहे. तसेच या कार्यशाळेत श्री रघुनाथ बारड हे देखील अपंगांच्या विविध कायदेविषयक मार्गदर्शक करणार आहेत. तरी या बातमी सोबत जोडलेला गुगल फॉर्म भरून व त्यासोबत रुपये 50/- रजिस्ट्रेशन फी भरून आपण या कार्यशाळेत सहभागी व्हावे, ही अनामप्रेम कडून विनंती.