प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, बीडमधील मोर्चा म्हणजे शिमगा…, गुणरत्न सदावर्तेंची टीका

  • Written By: Published:
प्राजक्ता माळी, रश्मिका मंदानाला पाठिंबा, बीडमधील मोर्चा म्हणजे शिमगा…, गुणरत्न सदावर्तेंची टीका

Gunaratna Sadavarte : सरपंच संतोष देशमु (Santosh Deshmukh) यांची हत्या होऊन वीस दिवस उलटून गेले तरी अद्याप या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं नाही. या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी विरोधकांनी केली. बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. वाल्मिक कराड (Walmik Karad) यांना अटक करावी आणि धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही या मोर्चात करण्यात आली. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी आवक आता भाष्य केलं.

आमदार धसांना सुशांत शेलारांनीही सोडलं नाही, म्हणाले, वाचाळवीरांमुळे.., 

बीडमधील मोर्चा वाटला नाही, तो शिमगा
बीड येथील धस, जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वत:च्या स्वार्थासाठी होता, कोणालाही न्याय मिळवण्यासाठी तो मोर्चा नव्हता. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूचे राजकारण किती करायचे याला मर्यादा असतात. वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही तो मोर्चा काढला होता, परंतु, तो शिमगा वाटत होता.  दु:ख आणि दुखवटा कशाला म्हणतात ते एसटीतल्या कर्मचाऱ्यांकडून शिका, असा हल्लाबोल सदावर्तेंनी धस यांच्यावर केलाय.

तळाच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सावरलं, भारतीय गोलंदाज दमले; कांगारूंना 333 धावांची आघाडी 

पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही वाल्मिकी कराड यांना अटक करा असं म्हणत आहात, पण वाल्मिकी कराड साहेब आतापर्यंत कुठल्या एफआयआरमध्ये आहेत का? आधी फाशी आणि नंतर चौकशी असा कायदा आहे का जगात? धनंजय मुंडे वंजारी आहेत म्हणून टार्गेट करत आहात का? कालच्या मोर्चात म्होरके सोडले तर कोणी सुध्दा नव्हतं. कालचा मोर्चा असंवैधानिक होता. वाल्मिकी कराड मर्डरमध्ये आरोपीच नाही तर मग त्यांना नोटीस तरी देता येईल का? अटकेसाठी पुरावे लागतात, असं सदावर्तेंनी म्हटलं.

प्राजक्ता माळी यांना माझा पाठिंबा
धस नावाचे आमदार आहेत, त्यांचा मला निषेध करायचा आहे. महाराष्ट्रात कलाकारांना अशा प्रकारे अपमानित करायचं धारिष्ट धस यांच्यात कसं आले? विधानसभेच्या सभापतानी सुरेध धस यांच्यावर कारवाई करावी. प्राजक्ता माळी यांना माझा पाठिंबा आहे. प्राजक्ता माळी, रश्मिका मंदान्ना, सपना चौधरी या सर्वांना माझा मला पाठिंबा आहे. आम्ही कलावंतासोबत आहोत, असं सदावर्तेंनी म्हटलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube