आमदार धसांना सुशांत शेलारांनीही सोडलं नाही, म्हणाले, वाचाळवीरांमुळे..,
Prajakta Mali News : राज्यात सध्या भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा सर्वच स्तरातील नागरिकांमधून निषेध केला जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही आमदार सुरेश धस यांच्या विधानाची दखल घेत निषेध व्यक्त केलायं. अशातच अभिनेते आणि शिंदे गटाच्या चित्रपट संघटनेचे प्रमुख सुशांत शेलार यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन निषेध केलायं. काही वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वातावरण दुषित झालं असल्याचं सुशांत शेलारांनी या पोस्टमध्ये म्हंटलंय.
आमदार सुरेश धस यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी यांच्यावर हल्लाबोल करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केलायं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून टीका -टिप्पणी केली जात असतानाच आता कलाकारांकडूनही धसांच्या विधानावर आक्षेप घेत निषेध केला जात आहे. शेलार यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “कालपासून सगळ्या न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावरती एका वाचाळवीरा कडून “महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री प्राजक्ता माळी” यांच्या बद्दल जी खालच्या पातळीची टीका होत आहे, त्याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. अशा पद्धतीने कुठल्याही महिला कलाकाराला राजकारणात खेचून खालच्या पातळीवर टीका करणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अश्या काही वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दुषित झाले आहे. त्यांना वेळीच आळा घातला पाहिजे. मी एक कलाकार म्हणून “प्राजक्ता माळी” यांच्या सोबत आहे” असं शेलारांनी म्हटलंय.
मोठी बातमी! मंत्रिपद मिळालं… तरीही प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास शेलार-बावनकुळेंचा नकार, कारण…
काय म्हणाले होते आमदार धस?
जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल असं धस म्हणाले. तसेच प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटी परळीत येत असतात, असा हल्लाबोल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुुंडे यांच्यावर हल्लाबोल करताना स्पष्ट केलंय.
राजकारण्यांना अशी कृत्ये शोभत नाहीत…
महाराष्ट्रातील राजकारण्यांना अशा प्रकारचे कृत्य शोभत नाही. महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे नाही तर त्यांच्या कर्तुत्वावर देखील शिंतोडे उडवत आहेत. प्रसारमाध्यमे आपला टीआरपी वाढवण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातम्या करतात तुमच्या एका बातमीमुळे एखादा आत्महत्या करू शकतो. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन पत्र देणार आहे. मला जर न्याय मिळाला नाही तर कायद्याच्या चौकटीत राहून मी कलाक्षेत्रातील महिलांसाठी खंबीरपणे नेतृत्व करेल आणि सर्व कलाकार माझ्या पाठीशी उभे आहेत, असं धारदार प्रत्युत्तर अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी माध्यमांशी बोलताना दिलंय.