Download App

‘हे स्मशानात इव्हेंट करणारे सरकार’; रेल्वे अपघातावरुन राऊतांचे खडेबोल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ओडिसा येथील बालासोर अपघातावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या अपघाताचे प्रायश्चित्त कोण घेणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी ज्यावेळी घटनास्थळावर गेले तेव्हा तिथे देखील मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्या, असे म्हणत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

हे अपघाताचे इव्हेंट करणारे सरकार आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याठिकाणी गेले तेव्हा देखील मोदी-मोदी घोषणा देण्यात आला. स्मशानातदेखील इव्हेंट करण्याचे काम सध्या सुरु आहे, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारला सुनावले आहे.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

बालासोर हा इतिहासातील भीषण अपघात आहे. सरकारने देशातील ट्रेन अगोदर नीट चालवाव्या. सिंगल लेन जेवढे करता येईल, तेवढे करावे पण  हे कर्ज काढून बुलेट ट्रेन आणतायत, अशा शब्दात राऊतांनी देशाच्या रेल्वे धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Video : गुजरात दंगल : मोदी टार्गेटवर कसे आले?

लालबहादूल शास्त्री, माधवराव सिंधीया हे रेल्वेमंत्री असताना त्यांनी अपघातानंतर राजीनामा दिला होता. 300 पेक्षा जास्त निरपराध लोकं मारली गेली. याचं प्रायश्चित्त कोण घेणार? पंतप्रधान मोदी राजीनाम देणार आहे का? असे म्हणत त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला.

Tags

follow us