दीड महिन्यात पुन्हा बदली तुकाराम मुंढेंची बदली; आता कोणत्या विभागाची जबाबदारी?

तुकाराम मुंढे ज्या विभागात जातात तिथे ते कामात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यावर त्यांचा भर असतो.

News Photo   2026 05 19T212942.293

दीड महिन्यात पुन्हा बदली तुकाराम मुंढेंची बदली; आता कोणत्या विभागाची जबाबदारी?

प्रशासकीय सेवेतील अत्यंत आपल्या धडाकेबाज (Tukaram Munde) निर्णयांनी कायम चर्चेत असणारे तुकाराम मुंढे यांची दीड महिन्यातच पुन्हा एकदा बदली झाली आहे. गेल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदली होण्याचा एक आगळावेगळा पण प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा विक्रम मुंढे यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात ‘सिंघम’ अशी ओळख असलेले 2005 बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग या महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिवपदी दीड महिन्यापूर्वी बदली करण्यात आली होती. नियमानुसार एखाद्या पदावर तीन वर्षे काम करणे अपेक्षित असताना मुंढे यांची अवघ्या महिन्याभरातच पुन्हा बदली करण्यात आली आहे.

बदली झाल्यानंतरही अविनाश पाठकने आदेश काढले; मोबाईल रेकॉर्डिंगमुळे 241 कोटींचा घोटाळा कसा उघडकीस आला ?

तुकाराम मुंढे ज्या विभागात जातात तिथे ते कामात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यावर त्यांचा भर असतो. मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे सामान्य जनतेला नेहमीच दिलासा मिळतो. कार्यालयात वेळेवर न येणारे कर्मचारी असोत किंवा राजकीय दबावाखाली चुकीचे काम करणारे अधिकारी मुंढे कोणाचीही गय करत नाहीत. कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय निर्णय घेण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे ते सत्ताधाऱ्यांच्या पसंतीस उतरत नाहीत. यामुळेच 21 वर्षांच्या सेवेत 25 बदल्या झाल्या आहे. शासनाने लवकरात लवकर कार्यभार स्विकारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

IAS तुकाराम मुंढे यांची आतापर्यंतची कारकीर्द

ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
जानेवारी 2008 – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग.
जुलै 2009 – सीईओ, वाशिम.
जून 2010 – सीईओ, कल्याण.
जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना.
सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी.
मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका.
नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन.
डिसेंबर 2018 – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका.
ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
सप्टेंबर 2022 – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
एप्रिल 2023 – सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
जून 2023 – सचिव मराठी भाषा विभाग
जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव
जून 2024 – विकास आयुक्त, असंघटित कामगार विभाग
ऑगस्ट 2025- सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्त मंत्रालय
31 मार्च 2026 – प्रधान सचिवआपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग

Exit mobile version