Kunal Kamra On BookMyShow : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने एका कार्यक्रमात गाणं म्हटल्याने खार पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर आता प्रसिद्ध तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म बुकमायशोने कुणाल कामरा याला मोठा धक्का देत त्याचा नाव विक्री आणि कलाकारांच्या यादीतून काढून टाकले आहे. तसेच त्याचे सर्व कंटेंट देखील बुकमायशोने (BookMyShow) काढून टाकले आहे. तर आता या प्रकरणात कुणाल कामरा याने बुकमायशोला प्रत्युत्तर दिले आहे.
कुणाल कामरा याने एक्स वर पोस्ट करत बुकमायशोला प्रत्युत्तर दिले आहे. कुणालने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, नमस्कार @bookmyshow माझ्याकडे माझे शो लिस्टींग करण्यासाठी तुमचा प्लॅटफॉर्म आहे का ते कन्फर्म कराल का? जर नसेल तर ठीक आहे. मला समजले… असं कुणाल कामरा याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
कुणाल कामरा याला बुकमायशोने ब्लॅक लिस्ट केला असल्याची माहिती शिवसेना नेते राहूल एन कनल यांनी दिली. तसेच त्यांनी या निर्णयाबद्दल बुकमायशोचे सीईओ आशिष हेमराजानी यांचे आभार मानले आहेत. राहुल कनाल यांनी एका पत्रात लिहिले आहे की, अशा कलाकाराला व्यासपीठावरून काढून टाकण्याचा तुमचा निर्णय हा एक मोठा निर्णय आहे. मुंबईकरांना प्रत्येक कला आवडते, पण कोणाचेही वैयक्तिक राजकारण नाही. असं त्यांनी या पत्रात लिहिले आहे. तर दुसरीकडे बुकमायशोने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Hello @bookmyshow can you please confirm if I have your platform to list my shows if not it’s fine. I understand… https://t.co/JqjJtuWFE3
— Kunal Kamra (@kunalkamra88) April 5, 2025
देवाभाऊंसमोर भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रीय नेत्यांचा विसर, कार्यालय फलकाची शहरात रंगली चर्चा
मुंबई पोलिसांनी तीनदा समन्स पाठवले
या प्रकरणात कुणाल कामरा याच्या विरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे चौकशीसाठी पोलिसांनी कुणाल कामरा याला तीनदा समन्स पाठवले आहे मात्र कुणाल अद्याप चौकशीसाठी हजर राहिलेला नाही. या प्रकरणात कुणाल कामराविरोधात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आम्ही एअर इंडियाच्या चेअरमनला मारले वॉचमनला नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला