आम्ही तयार आहोत! जुन्या पेन्शन योजनेच्या गोंधळात कोल्हापुरातील ‘त्या’ पोस्टरनं वेधलं लक्ष

Old Pension Scheme : एकीकडे जुन्या पेन्शनवरून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. यामुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीसाठी राज्यातील विविध ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. या सर्व घडामोडींमध्ये कोल्हापुरात आज सरकारी कर्मचारी आणि संपाविरोधात बेरोजगार तरूण आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हातात […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (14)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (14)

Old Pension Scheme : एकीकडे जुन्या पेन्शनवरून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. यामुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीसाठी राज्यातील विविध ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. या सर्व घडामोडींमध्ये कोल्हापुरात आज सरकारी कर्मचारी आणि संपाविरोधात बेरोजगार तरूण आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी हातात धरलेल्या एका पोस्टरनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याबाबत लोकमत डॉट कॉमनं वृत्तप्रकाशित केले आहे.

दुखावलेली मान सांभाळत MBBS मध्ये शिकलेलं काही आठवतंय का? म्हणत अमोल कोल्हेंनी शेअर केला व्हिडीओ

कोल्हापुरातील दसरा चौकातून या मोर्चाला सुरूवात करण्यात आली. यावेळी हा मोर्चा आमदार खासदारांना पेन्शन मिळते म्हणून आम्हालाही द्या यासाठी आहे. जुनी पेन्शन बंद करा ती लागू करू नका आम्ही अर्ध्या पगारावर कामाला तयार आहोत अशा आशयाचं पोस्टर हातात मोर्चेकऱ्यांनी धरले होते. या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधलं.

जुन्या पेन्शन योजनेला MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीदेखील विरोध केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांनी रखडलेल्या विविध पदांवरील भरती लवकर भरण्याची मागणी केली आहे. आम्हाला पेन्शन नको पगार वेळेवर द्या अशी मागणी विद्यार्थांची आहे.
तर, दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या हत्यारामुळे राज्यातील सरकारी कामकाजावर झाला असून, लाखो सामन्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संपाबाबत विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवेदन दिले आहे. जुन्या पेन्शन योजनेचा सखोल अभ्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली जाईल असे म्हणत कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनानंतरही कर्मचारी संपावर ठाम असून, आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version