Download App

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच भाजपाच्या ‘या’ नेत्याने थेट हातच जोडले

संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यांच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रश्न विचारताच थेट हात जोडले.

Image Credit: Letsupp

Sambhaji Bhide Controversial Statement : सध्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची राज्यात चर्चा आहे. वटसावित्रीच्या पूजेवरुन संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं’ असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. (Sambhaji Bhide) त्यावरुन आता वाद निर्माण झालाय. पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना आधीच नोटीस पाठवली होती. आज पालखीला मानवंदना करताना कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची काळजी घ्या. (Girish Mahajan) तेढ निर्माण करणारी भाषणं आज करू नका, अशा सूचना पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना दिल्या होत्या.

हात जोडले संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री आणि…

भिडे यांच्या या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर गिरीश महाजन यांनी हात जोडले. प्रश्न विचारताच हात जोडत, चला म्हणत गिरीश महाजन यांनी उत्तर देणं टाळलं. काल लोणावळा भुशी डॅम परिसरात दुर्देवी घटना घडली. एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेले. त्या संदर्भात गिरीश महाजन म्हणाले की, ‘मी आज घटनास्थळावर जाऊन पाहणी करणार आहे. आमची टीम काम करत आहे. पाण्यात जाण्याचा मोह पावसाळ्यात आवरत नाही. मात्र, आपण काळजी घेतली पाहिजे.

कारवाई केली जाईल लोकसभा उपाध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीचे अयोध्या कार्ड ? सपाच्या या  नेत्याचे नाव आघाडीवर

पीक विम्या संदर्भातही महाजन यावेळी बोलले. नाकापेक्षा मोती जड नको म्हणून आपण पीक विमा 1 रुपयात दिला आहे. ‘जर कुठे 100 रुपये घेवून काही लोक गडबड करत असतील तर कारवाई होईल’ असं ते म्हणाले. आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री तोडगा काढतील असं ते म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज