Sambhaji Bhide : भगव्या राष्ट्रध्वजासाठी संभाजी भिडे आक्रमक; सांगलीत शेकडो कार्यकर्त्यांसह पदयात्रा
Sambhaj Bhide News : वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांनी आज सांगलीत पदयात्रा काढली. भगव्या राष्ट्रध्वजाच्या मागणीसाठी आज स्वातंत्र्यदिनी त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ही पदयात्रा काढली होती. ऐन स्वातंत्र्यदिनीच ही पदयात्रा काढण्यात आल्याने वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी असंख्य कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे संभाजी भिडे स्वत: पदयात्रेच्या सर्वात शेवटी पायी चालत होते.
शरद पवार भाजपसोबत येणार का? गुप्त बैठकीतील चर्चेनंतर अमित शाहंचा थेट अजितदादांना फोन
भारत हे एक हिंदू राष्ट्र असून राष्ट्रध्वजही भगवाच असावा, असा युक्तिवाद संभाजी भिडेंसह कार्यकर्ते करताना दिसून येत आहेत. तसेच या पदयात्रेत भिडे यांच्या समर्थकांकडून पाकिस्तानविरोधात घोषणाबाजीही केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनीच ही पदयात्रा काढण्यात आल्याने या पदयात्रेची सध्या सर्वत्रच चर्चा होत आहे.
राज ठाकरेंना भाजपाची ऑफर; अजितदादा म्हणाले, मला असलं काही…
या आधीही संभाजी भिडेंनी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला फडकवण्यात येणाऱ्या तिरंगा ध्वजाला विरोध केल्याचं समोर आलं होतं. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आम्ही तिरंगा फडकवणार नसून राष्ट्रगीतही म्हणणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यानंतर आज त्यांनी थेट पदयात्राच काढत तिरंगा ध्वजाला विरोध दर्शवल्याचं दिसून आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून, भगव्या ध्वजाला हार प्रदान करून प्रेरणा मंत्राने ही पदयात्रा सुरू झाली. शिवाजी मंडई, मारुती चौक, हरभट रोड, कापड पेठ मार्गे राजवाडा चौक, स्टेशन चौक, बदाम चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या पदयात्रेची सांगता होणार झाली.
Ahmedangar Crime : स्मशानभूमीत दारुड्यांकडून महिलेचा विनयभंग, नगर शहरातील घटना…
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी राजाराम मोहन रॉय, महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्यासह साईबाबांवर आक्षेपार्ह विधान केलं होतं. हे विधान अमरावती जिल्ह्यातील आयोजित एका कार्यक्रमात केल्याचं समोर आलं होतं. या विधानाच्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर अमरावती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
15 ऑगस्टला दुखवटा पाळा :
15 ऑगस्टला भारताची फाळणी झाली. त्यामुळे 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस असूच शकत नाही. याच दिवशी देशाची फाळणी झाली असल्यामुळे स्वातंत्र्य दिन साजरा करण्याऐवजी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही कारण रविंद्रनाथ टागोरांनी 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिले असल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला होता.