कारने एकमेकांना धडक देताच अंधाधुंद गोळीबार; पुण्यात पुन्हा गँगवार, एकाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून फरार आरोपी सनी यादवचा शोध सुरू आहे.

News Photo   2026 06 01T213825.173

कारने एकमेकांना धडक देताच अंधाधुंद गोळीबार; पुण्यात पुन्हा गँगवार, एकाचा मृत्यू

पुणे पोलिसांनी एकीकडे शहरात गुन्हेगारीचं (Pune) प्रमाण कमी झालं असं सगळीकडे सांगत सुटले आहे. पण, असं असताना गुन्हेगारीच्या घटना काही केल्या कमी झाल्या नाही. अशातच शिरूर तालुक्यातील करडे घाटात गुन्हेगारी संघर्ष उफाळून आला आहे. दोन गुन्हेगार गटांच्या वादातून गोळीबार झााला आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात ही घटना घडली. दोन गुन्हेगार गटांमधील जुन्या वादाचे पर्यवसान थेट गोळीबारात झालं. या घटनेत सराईत गुन्हेगार विशाल काळे (वय २१) याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, मिसिंग लिंक तासभर बंद

करडे घाट परिसरात दोन गुन्हेगार गट आमनेसामने आले. अक्षरश: एकमेकांचा पाठलाग करून कारने एकमेकांना धडक दिली. त्याानंतर बेछुट गोळीबार झाला. या गोळीबारात सराईत गुन्हेगार विशाल काळे याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांचा शोध आणि घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय घडलं नेमकं?

शिरूरमधील करडे घाट परिसरात संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. दोन गुन्हेगारी गटांमध्ये झालेल्या वादातून थेट गोळीबार झाला. काही दिवसांपूर्वी शिरूरचे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्याकांडात मृत विशाल काळे आणि सनी यादव हे दोघेही आरोपी होते. दोन दिवसांपूर्वीच ते जामिनावर बाहेर आले होते. आणि आज करडे घाटात दोन्ही आरोपींच्या कारची समोरासमोर धडक झाली. यानंतर आरोपी सनी यादवने विशाल काळेवर चार राऊंड फायर केले आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याची क्रूरपणे हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून फरार आरोपी सनी यादवचा शोध सुरू आहे.

Exit mobile version