Download App

Sambhaji Bhide Controversy : ‘संभाजी भिडेची मिशी कापा अन् 1 लाख रुपये जिंका’; कोणी केली घोषणा?

Sambhaji Bhide Controversy : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (sambhaji bhide) हे वादग्रस्त विधान करून कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले, साईबाबा, राजाराम मोहन रॉय यांच्याविराेधात वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त हाेत आहे. अशातच समता परिषदेकडून मनोहर भिडेची मिशी कापणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. ही घोषणा समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.

टिळक पुरस्कार वितरणाला शरद पवार हे उपस्थित राहणारच ! विरोध करणाऱ्यांना रोहित पवारांनी सुनावले

वाघमारे म्हणाले, महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल नेहमीच बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, लाखों भक्तांचे श्रद्धा असलेले देवस्थान शिर्डीचे साईबाबा व राजा राममोहन राय यांच्यासह अनेक महापुरुषांच्या विषयी अपशब्द वापरले आहेत. तरीही भाजप सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. मात्र, अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना जनतेने धडा शिकवला पाहिजे.

तसेच संभाजी भिडे हा मूळ मनोहर कुलकर्णी असून भिडे समाजात अशांतता पसरवण्याचं काम करत आहे. महापुरुषांबद्दल अर्वाच्च गलिच्छ भाषेत बोलत आहे, याआधीही भिडेंनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. हा मनोहर कुलकर्णी-भिडे कुणाची भडवेगिरी करीत आहे, सवाल वाघमारे यांनी केला आहे.

‘भिडेला वेळीच ठेचा’, जितेंद्र आव्हाडांच्या फिर्यादीवरुन संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल…

दरम्यान, संभाजी भिडे यांनी अमरावतीत महात्मा गांधींसह इतर महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. एवढच नाहीतर काँग्रेस नेत्यांनी विधानसभेच्या अधिवेशनातही हा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर संभाजी भिडेंवर अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन भिडेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भिडेंच्या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे. आता संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी सर्वत्र होताना दिसून येत आहे.

भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वादग्रस्त विधानांची मालिका सुरु असतानाच आता संभाजी भिडे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत. एकीकडे अटकेची मागणी आणि दुसरीकडे भिडेंचे दौरे सुरु आहेत. भिडेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us