टिळक पुरस्कार वितरणाला शरद पवार हे उपस्थित राहणारच ! विरोध करणाऱ्यांना रोहित पवारांनी सुनावले

  • Written By: Published:
टिळक पुरस्कार वितरणाला शरद पवार हे उपस्थित राहणारच !  विरोध करणाऱ्यांना रोहित पवारांनी सुनावले

PM Modi’s Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या (ता.1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित राहणार आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) या पक्षाच्या नेत्यांनीही पवारांनाही या कार्यक्रम उपस्थित राहू नये, असे आवाहन केले आहे. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीबद्दल पुण्यात आपलं मत व्यक्त केलं आहे. (Sharad Pawar will attend the Lokmanya Tilak award distribution! Rohit Pawar)

रोहित पवार म्हणाले, उद्याचा कार्यक्रमाला शरद पवार हे जाऊन कुठलाही संभ्रम निर्माण होत नाही. महाराष्ट्राची एक परंपरा आहे. त्यानुसार सामाजिक कार्यक्रमाला जात असताना कुणीही राजकारण करू नये, अशी शरद पवार यांची भूमिका आहे. उद्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण पंतप्रधान यांना त्यांनीच त्या संस्थेच्या वतीने दिले होते. त्यामुळे कोणीही कितीही बोलले तरी ते कार्यक्रमाला जाणार असल्याचे रोहित यांनी सांगितले आहे.


PM मोदींसोबत व्यासपीठावर जाणारच! पवारांचा ‘मविआ’लाच धक्का; शिष्टमंडळाला भेटायलाही नकार

उद्याच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. माझे आणि तमाम जनतेचे कान उद्याच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. पंतप्रधान मोदींचे जे भाषण तिथे होईल ते बघायला हवे आणि राज्यात सध्या ट्रीपल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे उद्या काही घोषणा होऊन तरुणांना रोजगार मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्य सरकारला त्यांनी खोचक टोला लगावला.

सावरकरांचा किंवा आरएसएसचा कार्यक्रम असता तर मी शरद पवार यांना कार्यक्रमाला न जाण्याची विनंती केली असती. काळे झेंडे दाखवण्याचे कारण हे मणिपूर घटनेच्या संदर्भात आहे. मी त्यांनी विनंती करणार आहे की मणिपूरबद्दल मोदींशी चर्चा करा आणि राज्यातील आर्थिक स्थितीबद्दल त्यांच्याशी चर्चा करा, अस देखील यावेळी रोहित पवार म्हणाले.


…तर आज देशात दुध 300 रुपये अन् डाळी 500 रुपये असत्या; मोदींनी पुन्हा डागली तोफ

नितीन गडकरी यांनी शरद पवार हे जपानी बाहुली आहे या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले, त्यांचे धोरण हे विकासाचे राहिलेले आहे. राजकीय दृष्टिकोनातून गडकरी काय बोलले हे मला कळले नाही. राजकीय भूमिका जर विचारात घेतली तर पवार यांच्या मनात काय आहे ते कुणाला कळले नाही आणि कळणार पण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


भिडेंना अटक व्हावीच

संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले, एक व्यक्ती वादग्रस्त आहे मग त्या व्यक्तीवर कारवाई का केली जात नाही? भिडेंना सरकारचा पाठिंबा आहे का?
थोर व्यक्तींच्या व्यक्तीबाबत ते बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना अटक झालीच पाहिजे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube