Mumbai Train Firing : ‘भारतात रहायचे असेल तर मोदी आणि योगी…’, हल्लेखोर पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

Mumbai Train Firing : ‘भारतात रहायचे असेल तर मोदी आणि योगी…’, हल्लेखोर पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

Mumbai Train Firing Update : मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडालेली आहे. या दरम्यान आता या घटनेबाबतचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, ही घटना बदलीच्या तणावातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोळीबार करणारा कॉन्स्टेबल चेतन सिंह त्याच्या बदलीमुळे संतापला होता तसेच तो तणावातही होता. यात तणावाच्या स्थितीत चेतनने गोळीबार केला. ज्यात एएसआयसह एकूण 4 जणांचा मृत्यू झाला. ( Mumbai Train Firing Update Live in India Modi and Yogi Constables video viral)

Trial Period च्या यशानंतर जेनेलिया अन् मानवकडून आलिया सेनचं कौतुक

काय आहे हा व्हिडीओ?
दरम्यान आता या घटनेबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये चेतन सिंह हा प्रवाशांना हातात बंदूक घेऊन धमकावत आहे. तो म्हणत आहे की, हे लोक पाकिस्तानमधून ऑपरेट झाले आहेत. म्हणून मी त्यांना मारले. आपले माध्यमेही गेच सांगतील. भारतात रहायचे असेल तर मोदी आणि योगी शिवाय पर्याय नाही. तसेच तो या व्हिडीओमध्ये ठाकरेंचा देखील उल्लेख करतो. मात्र नेमके कोणते ठाकरे हे स्पष्ट ऐकू येत नाही.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं चर्चेतलं विधान! ‘शरद पवार म्हणजे जपानी गुडीयाचं’…

मुंबई-जयपूर एक्स्प्रेस ट्रेनने पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास चेतनने गोळीबार केला. या गोळीबारात एएसआय टिकाराम शहीद झाले, नंतर कॉन्स्टेबलने तेथे उपस्थित काही प्रवाशांवरही गोळीबार केला ज्यात तिघांचा मृत्यू झाला. ही गोळीबाराची घटना मुंबई-जयपूर एक्स्प्रेसच्या (ट्रेन क्रमांक- 12956) बी-5 बोगीमध्ये घडली. कॉन्स्टेबल चेतनने एएसआय टिकाराम आणि इतर ३ प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. गोळीबार झाला तेव्हा ट्रेनने पालघर ओलांडले होते.

गोळीबारानंतर कॉन्स्टेबलने ट्रेनमधून उडी मारली

पश्चिम रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पालघर स्थानक ओलांडल्यानंतर एका आरपीएफ कॉन्स्टेबलने चालत्या जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार केला. त्याने आरपीएफ एएसआय आणि इतर तीन प्रवाशांना गोळ्या घातल्या. त्यानंतर तो दहिसर स्थानकाजवळ ट्रेनमधून उतरला मात्र, त्याला शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube