…तर आज देशात दुध 300 रुपये अन् डाळी 500 रुपये असत्या; मोदींनी पुन्हा डागली तोफ

  • Written By: Published:
…तर आज देशात दुध 300 रुपये अन् डाळी 500 रुपये असत्या; मोदींनी पुन्हा डागली तोफ

PM Modi Attack On Opposition Parties In Rajkot :  पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी भाजपसह अनेक पक्षांनी मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. यावेळेसही एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात आली असून, निवडणुकांपूर्वी आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात झाल्याचे चित्र आहे. आज देशात आधीचे (काँग्रेस) सरकार असते तर, देशातील महागाई गगनाला भिडली असती, एवढेच नव्हे तर, नागरिकांना दुधासाठी 300 रुपये प्रतिलिटर आणि डाळींसाठी 500 रुपये प्रतिकिलो मोजावे लागले असते असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. ते राजकोट येथील रेसकोर्स मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

Mumbai Train Firing : जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार, एका पोलीस अधिकाऱ्यांसह 4 प्रवाशांचा मृत्यू

कोविड महामारी आणि युक्रेन युद्धाचे गडद सावट असतानाही भाजप सरकारने महागाईला लगाम घालण्यात यश मिळवले आहे, मात्र, पुर्वीचं सरकार असतं तर दुधाला ३०० रुपये प्रतिलिटर आणि डाळीला ५०० रुपये दर मोजावा लागला असता.

नाव बदलले मात्र जमात तीच…

यावेळी विरोधकांवर खरपूस समाचार घेत पंतप्रधान म्हणाले की, विरोधकांनी त्यांचे नाव बदलले आहे पण जमात तीच आहे. आता देश पुढे जात असताना काही लोकांना ते आवडत नाहीये. लोकांची स्वप्ने पूर्ण होत आहेत याचा त्यांना राग आला आहे, त्यामुळेच या भ्रष्टाचाऱ्यांनी आणि घराणेशाही लोकांनी त्यांच्या गटाचे नाव बदलले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांचे कल्याण हे भाजप सरकारचे प्राधान्य आहे. भाजप सरकारने 13 कोटी 50 लाख लोकांना गरिबीतून बाहेर काढले असून, सुशासनाची हमी देऊन आम्ही सत्तेवर आलो, आज आम्ही ते स्वप्न पूर्ण करत आहोत असेही यावेळी मोदींनी सांगितले.

Dhananjay Munde : …म्हणून पंकजा मुंडेंना पराभूत करू शकलो; बंधू धनंजय मुंडेंनी सांगितलं कारण

मोदी म्हणाले की, यापूर्वी शाळा, रुग्णालये, टॅक्स रिटर्नमध्ये सर्वत्र समस्या होत्या. परंतु डिजिटल इंडियामुळे या समस्या कमी झाल्या आहेत. पूर्वी बँकांच्या कामासाठी संपूर्ण दिवस लागायचा, टॅक्स रिटर्न भरणे हे एक आव्हान होते, पण आता डिजिटल इंडियामुळे लोकांना ते बँकेत कधी गेले तेच आठवत नाहीये.

पूर्वी लोक 1 GB डेटासाठी सुमारे 300 रुपये मोजायये, परंतु आता 20 GB डेटाची किंमत सुमारे 300-400 रुपये आहे, ज्यामुळे लोकांना त्यांच्या डेटा बिलावर महिन्याला सुमारे 5000 रुपये वाचविण्यात मदत होत आहे.नऊ वर्षांपूर्वी 2 लाख रुपयांच्या (वार्षिक) उत्पन्नावर कोणताही आयकर लावला जात नव्हता. आता, 7 लाख रुपयांच्या (वार्षिक) उत्पन्नापर्यंत कोणताही आयकर नसल्याचे उदाहरण यावेळी मोदींनी दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube