Mumbai Train Firing : जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार, एका पोलीस अधिकाऱ्यांसह 4 प्रवाशांचा मृत्यू

  • Written By: Published:
Mumbai Train Firing : जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार, एका पोलीस अधिकाऱ्यांसह 4 प्रवाशांचा मृत्यू

मुंबईमध्ये दहिसर ते मीरारोड दरम्यान मुंबई – जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत पोलीस अधिकारी आणि 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळतात जीआरपी पोलीस आणि आरपीएफ पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन अधिक तपास करत आहेत.

ही घटना आज (31 जुलै) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. पालघर आणि मुंबईदरम्यान दहिसरमध्ये गोळीबार झाला. गोळी झाडणाऱ्या पोलीस हवालदाराला मीरा रोडजवळ पकडले आहे. हवालदार मानसिक तणावाने त्रस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

गोळीबारानंतर कॉन्स्टेबलने ट्रेनमधून उडी मारली

पश्चिम रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “पालघर स्थानक ओलांडल्यानंतर एका आरपीएफ कॉन्स्टेबलने चालत्या जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार केला. त्याने आरपीएफ एएसआय आणि इतर तीन प्रवाशांना गोळ्या घातल्या. त्यानंतर तो दहिसर स्थानकाजवळ ट्रेनमधून उतरला. ” आरोपीं हवालदाराला शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे.”

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन क्रमांक12956 च्या B5 कोचमध्ये पहाटे 5.23 वाजता गोळीबार झाला. दुर्घटनेत प्राण गमावलेल्या एएसआयचे नाव टिळक राम आहे. चार जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

ट्रेनमध्ये दोन जवानांमध्ये हाणामारी झाली

ट्रेनमध्ये चेतन आणि तिलक राम या दोन जवानांमध्ये भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. वरिष्ठांशी झालेल्या भांडणानंतर चेतनने गोळीबार केला. गोळीबारामुळे ट्रेनमध्ये गोंधळ उडाला असून काही प्रवासी ट्रेनमधून उडी मारल्याने जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनची बदली झाल्यामुळे तो संतापला होता. यासोबतच तो कौटुंबिक तणावातही होता. मृतांचे मृतदेह बोरिवलीत उतरवण्यात आले असून ट्रेन पुढे रवाना करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube