Onion Price : ‘या’ भागात 35 रुपये किलो मिळणार कांदा; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Onion Prices : साखरेनंतर राज्यासह देशातील अनेक भागात कांद्याचे भाव देखील वाढल्याने नागरिकांच्या बजेट कोलमडलं आहे. वाढणाऱ्या या महागाईत

Onion Prices

Onion Prices

Onion Prices : साखरेनंतर राज्यासह देशातील अनेक भागात कांद्याचे भाव देखील वाढल्याने नागरिकांच्या बजेट कोलमडलं आहे. वाढणाऱ्या या महागाईत आता नागरिकांकडून लवकरात लवकरत साखर आणि काद्यांच्या भावात कमी करण्यात यावे अशी मागणी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता काद्यांबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णायनुसार केंद्र सरकार आता 35 रुपये किलोने कांदा विकणार आहे.

राज्यासह देशातील अनेक भागात कांदा 60 ते 70 रुपये विकला जात आहे. त्यामुळे आता या भागात कांदा 35 रुपये किलो विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ज्या भागात कांद्याचे भाव वाढले आहे. त्या भागात नाशिकमधून सरकारी बफऱ स्टॉकमधील कांदा स्पेशल मालगाडीतून म्हणजेच कांदा एक्सप्रेसमधून देशातील वेगवेगळ्या राज्यात पाठवला जाणार आहे. या रेल्वेने सर्वप्रथम चेन्नई, मदुराई, कोच्ची आणि गुवाहाटीला कांदा पाठवला जाणार आहे. तर 800 टनाहून अधिक कांद्याची दुसरी खेप दिल्लीसह उत्तर भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये पाठवण्यात येणार आहे.

कुठे मिळेल 35 रुपये किलो कांदा?

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांपर्यंत कमी दरात कांदा पोहोचवण्यासाठी सरकारी आणि सहकारी एजन्सींकडे जबाबदारी देण्यात आली आहे. सामन्य ग्राहक या सरकारी आऊटलेट्स आणि व्हॅनमधून 35 रुपये किलोने कांदा खरेदी करु शकतात.

भारत हॉकी विश्वचषकातून बाहेर ; 51 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच

तसेच सामन्य ग्राहक NAFED, नॅशनल कोऑपरेटिव्ह कंज्यूमर्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि केंद्रीय भंडारमधून कांदा खरेदी करू शकतील. NCCF आणि NAFED द्वारा संचालित मोबाइल व्हॅन आणि ‘भारत ब्रँड’च्या आउटलेट्सवर स्वस्त दरात कांद्याची विक्री करण्यात येणार आहे.

Exit mobile version