Download App

धक्कादायक.. विश्वास नांगरे पाटलांच नाव घेत महिलेची ऑनलाईन फसवणूक, 40 लाखांना घातला गंडा

Online Frauds : कोरोना काळानंतर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यासाठी ऑनलाईन पद्धतींचा वापर करण्यात येत आहे. जेवणासाठी

Online Frauds : कोरोना (Corona) काळानंतर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यासाठी ऑनलाईन पद्धतींचा वापर करण्यात येत आहे. जेवणासाठी, शॉपिंगसाठी आज अनेकजण ऑनलाईन पद्धतीने व्यवहार (Online transaction) करत आहे. मात्र दुसरीकडे ऑनलाईन फसवणुकीचे (Online Frauds) प्रमाण देखील देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. फसवणूक करणारे सर्वसामान्यांना लाखोंचा गंडा घालत आहे.

तर आता अशीच एक धक्कादायक बातमी रागयड जिल्ह्यातून समोर आली आहे. या बातमीनुसार, रायगड जिल्ह्यात पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर करून एका महिलेला 40 लाखांचा गंडा घातला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, शनिवारी रात्री मोबाईलवर कॉल करून महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. अलिबागमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अलिबागमधील गोंधळपाडा येथील एका महिलेला शनिवारी रात्री अज्ञात नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल आला. आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथोरेटी ऑफ इंडियामधून बोलत असून तुमच्या आधारकार्डचा गैरवापर करण्यात येत आहे, यामुळे तुमचा फोन बंद होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. याच फोन पोलीस अधिकारी दीक्षित मॅडम आणि विश्‍वास नांगरे पाटील बोलत असल्याचे असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

तसेच तुमच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असून आता ईडी, सी.बी.आय, मुंबई पोलिसांकडून अटक वॉरंट जारी होणार अशी भीती महिलेला दाखवण्यात आली. या भीतीमुळे महिला घाबरली आणि आरोपीच्या जाळ्यात अडकली. यानंतर याचा फायदा घेत आरोपीने महिलेकडून बँकेतील सर्व माहिती घेतली आणि बँक खात्यातून ऑनलाईन 40 लाख 73 हजार 719 रुपये गायब केले.

शिंदेंच्या बालेकिल्यात वर्चस्वाची लढाई, ठाण्यात कोण मारणार बाजी?

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने पोलीस ठाण्यात जाणून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

follow us