Mobile SIM Card : सरकारचा मोठा निर्णय, बंद होणार लाखो सिमकार्ड, ‘हे’ आहे कारण

Mobile SIM Card : सरकारचा मोठा निर्णय, बंद होणार लाखो सिमकार्ड, ‘हे’ आहे कारण

Mobile SIM Card :  देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार केंद्र सरकार लाखो लोकांचे सिमकार्ड (SIM cards) बंद करणार आहे. माहितीनुसार, केंद्र सरकार ज्या सिमकार्डवर कारवाई करणार आहे त्या सिमकार्डवर सरकारला चुकीच्या हालचाली किंवा फसवणूक इत्यादीचा संशय आहे.

18 लाख सिमकार्ड बंद होतील

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार एकच वेळी तब्बल 18 लाख सिमकार्ड बंद करणार आहे. या कारवाई अंतर्गत सरकारने काही दिवसापूर्वी देशातील टेलिकॉम कंपनी Jio, Airtel आणि Vi  यांना 28 हजार पेक्षा जास्त सिम कार्ड बंद करण्याचा आदेश दिले होते.

फसवणूक आणि घोटाळे रोखण्यासाठी प्रयत्न

देशात दिवसेंदिवस लोकांची ऑनलाईन पद्धतीने आर्थिक फसवणूक होताना दिसत आहे. यामुळे या फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. याच बरोबर सरकारने सर्व टेलिकॉम कंपन्यांना लाखो सिमकार्ड्सची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेशही दिले आहेत. या कारवाई अंतर्गत सरकार पुढील 15 दिवसांसाठी सिमकार्ड ब्लॉक करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  चुकीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या सिमकार्डवर या पद्धतीने सरकार नियंत्रण ठेवण्याचा विचार करत आहे.

थांबा ओ, ‘या’ दिवशी भारतीय बाजारात लाँच होणार Maruti Suzuki Swift CNG

या लोकांवर होणार कारवाई

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य  सिमकार्ड वापरकर्त्यांना कोणतीही अडचण येणार नाही मात्र जे लोक चुकीच्या  कामांसाठी सिम कार्डचा वापर करत असाल तर त्यांच्यावर सरकारच्या या निर्णयानंतर कारवाई करण्यात येणार आहे.

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन; वाचा, नक्की काय घडलं

follow us
  • fb
  • instagram
  • youtube