सोलापूरमध्ये भाजपला मोठा धक्का; पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, करमाळ्यात भाजपला रोखण्यात विरोधकांना यश

सोलापूरमधील पाच नगरपरिषदांमध्ये मोठा धक्का बसला. हाती आलेल्या माहितीनुसार पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, कुर्डुवाडी आणि करमाळ्यात भाजप पिछाडीवर.

Untitled Design (131)

Untitled Design (131)

Big blow to BJP in Solapur : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीची निवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी सुरू असून जिल्ह्यातील 12 ठिकाणी भाजप स्वतः लढत असून त्यांच्याविरोधात इतर पक्ष अशीच लढत पाहायला मिळत आहे. मात्र नुकत्याच हाती आलेल्या कलानुसार भाजपला सोलापूरमधील पाच नगरपरिषदांमध्ये मोठा धक्का बसला आहे. राजन पाटील(Rajan Patil) यांच्यामुळे सोलापूरमधील(Solapur)  निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती. आता हाती आलेल्या माहितीनुसार पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज, कुर्डुवाडी आणि करमाळ्यात भाजप(BJP) पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या सगळ्या जागांवर भाजपने आपलं वर्चस्व पणाला लावलं होतं. मात्र पंढरपूर कॉरिडॉरचा भाजपला मोठा फटका बसल्याच येथे पाहायला मिळाल.

सांगोला नगरपरिषद निवडणुकीच्या शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पॅनेलने उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यांचे उमेदवार आनंदा माने यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. आनंदा माने यांच्या विरोधात याठिकाणी सर्वच प्रमुखपक्षांनी एकतर येत विरोधात लढा दिला होता. मात्र त्यांना एकट्याने जरी लढा द्यावा लागला असला तरी त्यांच्या या एकतर्फी लढ्याला जनतेने पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. नगराध्यक्ष पदावर उमेदवार विजयी झाल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी मतदानाचे आभार मानले आहेत.

Akot Election : मोठी बातमी! अकोटमध्ये एमआयएमचे दोन नगरसेवक विजयी

पंढरपूर नगरपरिषद

भाजपला रोझण्यासाठी भाजपच्या विरोधात इतर पक्षांनी स्थानिक आघाडी केली होती. पंढरपूर नगर परिषदेत भाजप विरुद्ध शिवसेनेत शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार, काँग्रेस यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी तसेच शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांची विठ्ठल परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळत होती. निवडणुकीत भाजपतर्फे शामल शिरसाठ, तीर्थक्षेत्र आघाडीतर्फे प्रणिता भालके तर विठ्ठल परिवर्तन आघाडीतर्फे सारिका साबळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.

मंगळवेढा नगरपरिषद

मंगळवेढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत होत आहे. यामध्ये शरद पवार गटाला काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची साथ असणार आहे. भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी सुप्रिया जगताप तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुनंदा अवताडे यांच्यात लढत होणार आहे.

Suhas Kande : मोठी बातमी! आ.सुहास कांदे यांनी नांदगावचा गड राखला; शिवसेना शिंदे गटाचे सागर हिरे विजयी

अकलूज नगरपरिषद

अकलूज मध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गट अशी तिरंगी लढत आहे.माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वात भाजप+शिवसेना शिंदे सेनेकडून पूजा कोथमीरे तर मोहिते पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रेश्मा आडगळे तसेच धवलसिंह मोहिते पाटलाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून देवयानी रास्ते यांच्यात मुख्य लढत असणार आहे.

करमाळा नगरपरिषद

करमाळा नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप + राष्ट्रवादी अजितदादा गट विरुद्ध सचिन सावंत यांच्या नेतृत्वात स्थानिक आघाडी अशी तिरंगी लढत असणार आहे. भाजपकडून सुनीता देवी तर शिवसेना शिंदे गटाकडून नंदिनी जगताप तसेच शहर विकास आघाडीकडून मोहिनी सावंत यांच्यात मुख्य लढत असणार आहे.

कुर्डुवाडी नगर परिषद

कुर्डूवाडी नगर परिषदेत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गट + आठवले गट विरुद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट + शिवसेना शिंदे गट अशी चौरंगी लढत होणार आहे. कुर्डूवाडीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे जयश्री भिसे, भाजपकडून माधवी गोरे, काँग्रेस कडून मनीषा गवळी तर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून सुरेखा गोरे आणि शिवसेना शिंदे गटाकडून समिरून्नीसा मुलाणी यांच्यात मुख्य लढत असणार आहे.

Exit mobile version