Pahalgam Terrorists Attacked : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terrorists Attacked) येथे आज दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला असून या हल्य्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे तर 20 जखमी झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या धक्कादायक घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. दिलीप डिसले, अतुल मोने असं मृत्यू झालेल्या पर्यटकांचं नाव आहे. तर या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिले की, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 22, 2025
जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध : मुरलीधर मोहोळ
दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. जगदाळे आणि गनबोटे कुटुंबाच्या मी संपर्कात आहे. यासोबतच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या आणि मदतीच्या अनुषंगाने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कौस्तुभ यांच्या मुलीशी माझा संपर्क झाला आहे. त्यांना आवश्यक असलेली वैद्यकीय व अन्य मदत, उपचार दिले जात आहेत. या मुलीसमोरच तिच्या वडिलांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. मदतकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कडक शब्दांत याची निंदा केली आहे. आवश्यक ती सर्व कडक कारवाई केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरमध्ये रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आम्ही काळजीने सर्व गोष्टी करीत आहोत. अशी प्रतिक्रिया केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये
दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी (PM Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी फोनवर चर्चा करून कडक कारवाईचे आदेश दिले आहे. अमित शहा म्हणाले की, या भयानक दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि आम्ही गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू आणि त्यांना कठोर शिक्षा देऊ.