Download App

पंकजा मुंडे भावी उपमुख्यमंत्री; माजलगावमध्ये झळकले बॅनर, राजकीय चर्चांना उधाण

विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पंकजा मुंडे यांना शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी त्यांचा भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख केलाय.

  • Written By: Last Updated:

Pankaja Munde  : विधान परिषदेतील विजयानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विधान परिषदेमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय झाल्याचे घोषित झाल्यानंतर बीडमधील त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (Pankaja Munde) आता माजलगावमधील काही उत्साही कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचं अभिनंदनाचं पोस्टर लावलंय. (MLC) त्यावर पंकजा मुंडे यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय.

पुजा खेडकरच्या आईचं पंकजा मुंडेंच्या कारखान्याशी कनेक्शन;इतक्या लाख रुपयांचा दिला होता चेक

भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा भावी उपमुख्यमंत्री मा. पंकजाताई मुंडे यांचं हार्दिक अभिनंदन असं लिहीत माजलगावमध्ये पंकजा मुंडे यांना कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. माजलगावच्या पंकजा मुंडे समर्थकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरजी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यात पंकजा मुंडे यांचा देखील समावेश होता. त्यामध्ये पंकजा मुंडे यांना 26 मतांनी विजय झाला आहे. त्या नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.

पाचही उमेदवारांचा विजय

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पाच उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील समावेश होता. याआधी भाजपने पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून लोकसभेच्या मैदानात उतरवलं होतं. पण, त्यांचा शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधान परिषदेला संधी द्यावी अशी मागणी केली होती. ती मागणी मान्य झाली. भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे.

मंत्रिपद मिळण्याची शक्यता विधान परिषद निवडणुकीतील गद्दारी महागात पडणार; फुटलेल्या काँग्रेस आमदारांची नावं आली समोर

ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना संधी देऊन भाजपने वेगळा संदेश दिला असल्याची चर्चा आहे. याशिवाय पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देखील मिळण्याची शक्यता आहे. त्यातच आता माजलगावमध्ये त्यांचा भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख करणारे पोस्टर लागलं असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, काही उत्साही कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलं असल्याची माहिती मिळत आहे.

 

follow us