Download App

Parli Vidhan Sabha Result : परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; तब्बल 50 हजारांनी मिळवला विजय

बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. राजेसाहेब देशमुख यांचा पराभव करत दणदणीत विजय

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde wins from Parli assembly constituency 2024 : महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे, त्यामध्ये बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.

2019 मध्ये मुंडे भावा-बहिणीत झाली होती लढत

2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात थेट लढत झाली होती. यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा 30 हजार 701 मतांनी पराभव झाला होता.

धनंजय मुंडे मागील 22 वर्षांपासून परळीत कार्यरत आहेत. जिल्हा परिषद सदस्य ते कृषी मंत्रीपदापर्यंत त्यांनी काम केलं आहे. त्यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. ओबीसी समाजाचाही त्यांना पाठिंबा आबे. त्यातच यावेळी त्यांना पंकजा मुंडेंचीही साथ मिळाली आहे. पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या होत्या.

Maharashtra Election Result : कसब्यातून हेमंत रासने विजयी

follow us