Parth Pawar And CM Fadnavis Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. पार्थ पवार यांच्यासोबत असणाऱ्या शीत युद्धामुळे सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन तर प्रफुल पटेल यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावरुन हटवण्यात आल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र यावर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
तर दुसरीकडे आता पक्षाचे खासदार आणि जनरल सेक्रेटरी पार्थ पवार (Parth Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadnavis) यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे शासकीय निवसा ‘वर्षा’ येथे भेट घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. काल रात्री झालेल्या या भेटीमुळे राज्याती राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या भेटीसाठी पार्थ पवार एकटेच गेले होते. त्यांच्यासोबत पक्षाचा कोणताही बडा नेता नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. तसेच पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल पाऊण तास चर्चा झाली असल्याचं देखील सांगितलं जात आहे. मात्र या भेटीमागचं कारण काय? हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
राज्यात विजांच्या कडकडाटास वादळी पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार यांचं संघटनात्मक पातळीवर हस्तक्षेप वाढत असल्याची चर्चा आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या देण्यात आले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांनी अचानक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने आता राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार का? याबाबत सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
