Anjali Damania On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. या कंपनीने पुण्यातील मुंढवा येथील 800 कोटी बाजारभाव असलेली 40 एकर जमीन 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी करत या व्यवहारात स्टॅम्प ड्यूटी बुडविल्याचा आरोप पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर करण्यात येत आहे. या प्रकरणात सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने समितीची स्थापना करत एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) असताना या प्रकरणात चौकशी नीट होऊ शकते? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थितीत करत अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, या प्रकरणात नाव समोर आलेली शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) पत्र कलेक्टरला पाठवते पण कलेक्टर कारवाई करत नाही. त्या कलेक्टरवरतीही कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात पावर ऑफ अटॉर्नीची नोंद करण्यात आलेली नाही. कुठलाही व्यवहार करताना ती लागते. कुठलाही व्यवहार रद्द करताना विक्री आणि घेणारा तो व्यवहार रद्द करु शकतो. शीतल तेजवानी यांच्या कुटुंबाकडे या प्रकरणात खरेदी किंवा विक्रीचे अधिकार नाही. जमीन खरेदीचा व्यवहार पार्थ पवार आणि शीतल तजेवानी रद्द करु शकत नाही. एकाद्याने जर जाणून बुजून व्यवहार केला असेल तर त्याला तो करार रद्द करण्याचा अधिकार नाही असं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या.
पार्थ पवारांना व्यवहाराबाबात सर्व माहिती
पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, अमोडिया इंटरप्रिंसेस ही एक लिमिटेड लायबलिटी पार्टनशिप कंपनी आहे आणि जर पार्थ पवार (Parth Pawar) म्हणाले असते की करारासंर्दभात मला माहिती नव्हतं तर एकटे दिग्विजय पाटील अडकले असते. या पेपरवरती दोन्ही पार्टनरच्या सह्या आहेत, त्यामुळे पार्थ पवारांना या व्यवहाराबाबात सर्व कल्पना होती मात्र पार्थ पवार यांनी दिग्विजय यांना सगळे अधिकार दिले होते. पार्थ पवार यांची कंपनीत 99 टक्के भागीदारी आहे.
इंडियन आयडॉलवर जसपिंदर नरूला झाल्या भावूक: आठवलं पाहिलं गाणं
या प्रकरणाची चौकशीसाठी जी समिती तयार करण्यात आली आहे त्यात 5 जण पुण्याचेच आहे. त्यामुळे पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध चौकशी होऊ शकत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाची चौकशी होऊ शकते का? अजित पवार यांनी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केली.
WTC साठी आता 12 संघ भिडणार, ICC चा मोठा निर्णय; ‘या’ तीन संघाना मिळणार संधी
