पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण, मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समितीची स्थापना

Parth Pawar Land Case : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे.

Parth Pawar Land Case

Parth Pawar Land Case

Parth Pawar Land Case : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील 1804 कोटी रुपये बाजाराभाव असलेली 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणूक केली असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच या व्यवहारात पार्थ पवार यांच्या कंपनीने राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्क माफ करुन घेतल्याने या प्रकरणात आता सखोल चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी होत आहे.

तर आता या प्रकरणात (Parth Pawar Land Case) आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सुहास दिवसे यांच्यामार्फत सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय), पुणे राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती या प्रकरणी सखोल चौकशी करुन सविस्तर अभिप्रायासह आपला अहवाल 7 दिवसांत सादर करणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी काही धक्कादायक खुलासे होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

तर दुसरीकडे या प्रकरणात राज्य सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी पार्थ पवार (Parth Pawar) यांचे मामे भाऊ आणि अमेडिया LLP मध्ये त्यांचे भागीदार दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांच्यावर पुण्यातल्या बावधन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कुलमुखत्यार पत्र असणाऱ्या शीतल तेजवानी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे.

अंबादास दानवेंचे आरोप काय?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे. या कंपनीने 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींमध्ये खरेदी केली.

Sulakshana Pandit Death : बॉलिवूडवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन

तसेच या खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी करत या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.

Exit mobile version