मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी पार्थ पवारांचा पाय खोलात; मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमिडिया कंपनीला नोटीस

Parth Pawar यांची कंपनी असलेल्या अमिडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

Parth Pawar

Parth Pawar’s foot digs in Mundhwa land purchase case; Notice to Amedia company to pay stamp duty : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांवर माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जमीन व्यवहारावरुन आरोप केल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर यामध्ये पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण या प्रकरणामध्ये आता अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंची चौकशी समिती, तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं तातडीने निलंबन करण्यात आले आहे. तसेच आता यामध्ये पार्थ पवार यांची कंपनी असलेल्या अमिडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी पार्थ पवारांचा पाय खोलात…

पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यावहार प्रकरणी अमिडीया कंपनीला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस बजावली आहे. मुद्रांक शुल्काची 2 टक्के प्रमाणे 6 कोटी रूपये रक्कम भरण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान अमिडीया कंपनीने मुद्रांक शुल्कात सवलत घेऊन 500 रूपये एवढे मुद्रांक शुल्क भरले होते.मात्र ही सवलत केवळ 5 टक्के एवढीच असती. तर पुणे जिल्ह्यामध्ये 1 टक्का एलबीटी आणि 1 टक्का मेट्रो सेस म्हणून मुद्रांक शुल्क आकारलं जात. याला सवलत नसते. मात्र पार्थ पवार यांच्या अमिडीया कंपनीला मुद्रांक शुल्काची 2 टक्के प्रमाणे 6 कोटी रूपये रक्कम भरण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

धक्कादायक! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; अडीच कोटींची सुपारी अन् बीड कनेक्शन

दरम्यान या प्रकरणावर पार्थ पवार यांची देखील प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. ते म्हणाले की, आपण कोणतही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली मात्र या प्रकरणात अधिकची माहिती देण्यास पार्थ पवार यांनी नाकार दिला. पार्थ पवार यांनी या प्रकरणात अधिक माहिती देण्यास नाकार दिल्याने विरोधकांना राज्य सरकारवर जोरदार टीका करण्याची संधी मिळाली आहे.

चौकशी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची देखील या प्रकरणात पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

follow us