धक्कादायक! मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येचा कट; अडीच कोटींची सुपारी अन् बीड कनेक्शन
Manoj Jarange यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासाठी तब्बल अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती.
Conspiracy to kill Maratha protester Manoj Jarange 2.5 crores of betel nut and alleged involvement of a big leader from Beed : मराठा समाजाला आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून आरक्षण मिळवून देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र हा कट उधळून लावला आहे. तसेच यासाठी तब्बल अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती. तसेच याबाबत बीडमधील एका मोठ्या नेत्यावर आरोप करण्यात आले आहेत. हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊ…
अजित पवारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
मराठा आंदोलन मनोज जरांगेंच्या हत्याकांड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणून जरांगे यांची त्यांच्या एका सहकाऱ्यासोबत बीडमध्ये बैठक झाली होती. त्यानंतरच हा कट रचण्यात आला आहे त्यामुळे जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी या हत्येच्या कटामागे बीड मधील एका मोठ्या नेत्याचा हात असल्याचा आरोप केला आहे. पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यानंतर दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.
NTR Neel च्या पुढच्या शेड्यूलच्या तयारीत ज्युनियर NTR आणि प्रशांत नील, समोर आली खास झलक
तसेच याबाबत स्वतः मनोज जरांगे यांनी देखील जालना पोलीस अधीक्षक आणि रात्री उशिरा भेटले होते. दरम्यान या घटनेनंतर आता काळकुटे आहे. बीड पोलीस अधीक्षकांना देखील भेटून निवेदन देणार आहेत. तसेच बीडमधून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन जणांची नावे देखील समोर आले आहेत. अमोल खुणे आणि दादा गरुड असे या दोघांची नावे असून खुणे हा जरांगे यांचा जुना सहकारी आहे. तर या दोघांना कोट्यावधींची ऑफर देऊन हा कट रचण्यात आला होता.
