Download App

महाराष्ट्राची जनता धडा शिकवणार, बीआरएसविरोधात आशिष देशमुखांनी थोपटले दंड…

तेलंगणातून आलेल्या रजाकारांना महाराष्ट्राची जनता धडा शिकवणार असल्याचं भाजप नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केलं आहे. दरम्यान, यंदाच्या आषाढी वारीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं गुलाबी वादळ पंढरपुरात धडकलं आहे. त्यावरुन सर्वच पक्षांनी त्यांच्यावर टीका केली असून आता भाजपकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलंय.

मोठी बातमी! IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय, चर्चांना उधाण

आशिष देशमुख म्हणाले, तेलंगणा राज्यातून काही रजाकार गुलाबी कपडे परिधान करुन महाराष्ट्रावर आक्रमण करु पाहत आहेत, मात्र, इथली जनता त्यांनी धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचं ते म्हणाले आहेत.

संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानं नव्या वादाला तोंड; ठाकरे गटाची घणाघाती टीका

तसेच महाराष्ट्राच्या हद्दीतील चंद्रपूर जिल्ह्यातील दिवटी तालुक्यातील 13 गावांत तेलगू लोकांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप आहे. तेलगू भाषिकांकडून तिथल्या मराठी भाषिकांवर भाषावाद सुरु आहे. तेलगू भाषा लादण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

NCP : CM शिंंदेंचा राष्ट्रवादीला दणका; भिवंडीत 18 बंडखोर नगरसेवक अपात्र

त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला आता समजलंय. केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला महाराष्ट्राची जनता धडा शिकवणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

मराठी अस्मितेची गोष्ट असताना तेंलगणा राज्याचे आक्रमण आपले राज्य सहन करणार नाही. चंद्रपूरच्या 13 गावांत तेलगूंचे वाढते प्रथ आहे. ज्या पद्धतीने पाकव्याप्त कश्मीर आहे त्याच पद्धतीने तेलंगणा व्याप्त महाराष्ट्रातीलही 13 गावे असल्याचं देशमुख म्हणाले आहेत.

दरम्यान, मराठी अस्मिता जागरुक करणे गरजेचं असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली असून लवकरात लवकर कारवाई होणं अपेक्षित असल्याचंही देशमुखांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us