मी 30 वर्षे मुंबईत जाऊन काय लाटा मोजल्या नाहीत; रामराजे निंबाळकर लवकरच मोठा निर्णय घेणार?

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा रामराजे नाईक निंबाळकरांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित केली होती.

News Photo (12)

News Photo (12)

मुंबईला जाऊन 30 वर्षे मी काही लाटा मोजल्या नाहीत. कोणत्या पक्षात जायचं त्याचा निर्णय आम्ही घेऊ तुम्ही त्याबाबत अस्वस्थ होऊ नका तुम्ही फक्त तुमचे काम कराअसे म्हणत रामराजेंनी कार्यकर्त्यांचेही कान टोचले आहेत. (Nimbalkar) त्याचबरोबर कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय मी घेईल. पण अपक्ष तर आपलं मूळच आहे. मी कुठंही जाणार नाही, मी आहे त्याच पक्षात आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांना इशारा दिलाय.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्याना उद्देशून भाषण केले. पुढे बोलताना ते म्हणाले, विधानसभा  निवडणूक पराभव कार्यकर्ता जागृत नसल्यामुळे झाला. निवडणुकीच्या वेळेस पैसे वाटत होते त्यावेळेस तुम्ही काय करत होता? तुम्ही त्यांना अडवला का नाही? असा जाब देखील रामराजेंनी कार्यकर्त्यांना विचारला.

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा रामराजे नाईक निंबाळकरांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. फलटणमधील अनंत मंगल कार्यालयात हा आढावा बैठकीचा कार्यक्रम पार पडला. रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीमध्ये असले तरी संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. दरम्यान, आगामी काळात कशी वाटचाल करायची याबाबत रामराजे निंबाळकर यांनी दिवाळीच्या आदल्या दिवशी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

Video : शनिवारवाड्यासमोर नमाज पढण्याचा कथित व्हिडीओ व्हायरल?, घटनेने पुण्यात मोठी खळबळ

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या संदर्भात मी तुम्हाला बोललो होतो पण तो विषय बाजूलाच राहिला. निवडणूक झाली निवडणूक हरलो ज्यांना जायचं होतं ते गेले. गाव पातळीवर दौरा असेल तर लोक मला भेटत असतात. कुठल्या पक्षात जायचं यामुळे एवढं अस्वस्थ व्हायचं काय कारण? आपले मूळच अपक्ष आहे, मी कुठल्या पक्षात जाणार आहे असं नाही, मी आहे तिथे थांबणार आहे, असे रामराजेंनी स्पष्ट केले. सारखा बोलले जाते माझं वय झालंय माझं वय झालं मी काय वय लपवायला नटी आहे का? 2020 पासून वेगळ्या पद्धतीचा राजकारण आपल्या भागात सुरू झालं आहे.

प्रशासनाला हाताशी धरून वेगवेगळ्या केसेस लावण्याचा प्रयत्न केला गेला. हे लोक काय करतील हे सांगता येत नाही, त्याच्यामुळे ही निवडणूक तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवायचे काय करायचे ते. माझ्याकडे विकासकामाची काम घेऊन कोणी येत नाही, बदली आणि पोलीस स्टेशनची काम एवढेच काम माझ्याकडे येतात. मला स्वतःला आता काही मिळवायचं नाही. देणार कोण नाही, दिलं तर गव्हर्नर करतील? गव्हर्नर होऊन जम्मू-काश्मीरचा काय करता? असा मिश्किल टोलाही रामराजेंनी लगावाला.

ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचे त्यांनी राजकारणात येऊ नका, कार्यकर्ता कार्यकर्ता उभे करणारा पाहिजे, कार्यकर्ता कॉन्ट्रॅक्टर झाला तर मग तो सत्तेबरोबर जायला लागतो, असे म्हणत कार्यकर्त्यांचे कान देखील टोचले. दरम्यान, कोणत्या पार्टीत जायचं हे तुम्हाला काय करायचे, मी ठरवीन. काय कुठल्या पार्टीत जायचं ते तुम्ही ठरणार आहात का? ठरवणार असेल तर सांगा, त्यावर आपण मतदान घेऊ बघूया एक मत होते का? काय करायचं हे मला कळते. तीस वर्षे मुंबईला काय समुद्राच्या कडेला बसून लाटा मोजत बसलो नाही, असेही रामराजेंनी म्हटलं.

Exit mobile version