Mahadev Jankar Statement : मराठीच्या मुद्द्यावर मुंबईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच मंचावर आले. यासाठी मला उद्धव ठाकरेंनी फोन केला असल्याचं रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) लेट्सअपशी बोलताना धक्कादायक खुलासे केले आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्यावेळी एकत्र आले होते, तेव्हा त्यांनी मला बोलावलं होतं. मला राज ठाकरेंचा दोनदा फोन आला होता. बाळा नांदगांवकर आणि उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. यात काही वाईट नाही, मातृभाषेसाठी गेलं (Maharashtra Politics) पाहिजे, असं देखील महादेव जानकर यांनी म्हटलंय. त्यामुळे आम्ही मैत्रीतून गेलो. काही ठिकाणी राजकारणाचा डाव पण असू शकतो. उद्या काही करायचं असेल, तर एकमेकांची मदत पण लागू शकते.
भाजपचं ‘गुजराती कार्ड’! ठाकरे बंधू एकत्र येताच, नव्या रणनीतीचा खेळ सुरू…
मी गोट्या खेळायला आलो नाही
कॉमन मिनिमम शत्रू बनवून खेळू. पॉलिटिक्स आहे, ते. मी गोट्या खेळायला आलो नाही, मला पण या देशाचं राजकारणचं करायचं आहे, असा देखील टोला यावेळी जानकर यांनी लगावला. त्यावेळी मला आनंद झाला होता, त्यामुळे मी ठाकरेंना पेडा भरवला, असं देखील जानकर यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
कुलगाममध्ये रात्रभर धडकी भरवणारी चकमक! एक दहशतवादी ठार, दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सुरूच
महाराष्ट्राचं गणित बदलायला पाच मिनिटं खेळू शकतो. सुप्रिया सुळे माझ्या दुश्मन नाहीत, पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे त्या माझ्या बहीण आहेत. राजकारणात तिचा अन् माझा विचार वेगळा असू शकतो. आमचे पक्ष वेगवेगळे आहेत, त्यामुळे काळाच्या ओघात आमची युती होवू शकते. बच्चू कडू आणि आमची देखील युती होवू शकते. राजू शेट्टी येवू शकतात, असं देखील जानकर यांनी म्हटलंय.
गाढव घेवून दिल्लीला जाणार
लोकसभा अन् विधानसभा न्यायमंदिर आहेत. आमदार असताना प्रोटोकॉल पाळले पाहिजेत. मुंडे साहेब अन् गडकरी साहेब यांनी दोघांनी मला कमळ घे, बारामतीत निवडून येशील असं म्हटलं होतं. मी म्हटलो पडलो तरी चालेल, पण मी माझ्याच चिन्हावर लढणार आहे. माझा पराभव झाला, मी नाराज नाही, पण मी खुश आहे. मला माझाच घोडा घेवून दिल्लीला जायचं आहे. दुसऱ्याच्या घोड्यावर बसणार नाही. घोडा नाही मिळाला तर, गाढव घेवून का होईना, पण दिल्लीला जाणार, असं देखील यावेळी बोलताना महादेव जानकर यांनी स्पष्ट केलंय.