Download App

PM मोदी पुण्यातून फुंकणार विधानसभेचे रणशिंग, करणार मेट्रो मार्गाचे उद्घाटन

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची 26 तारखेची सभा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयाची नांदी असा निर्धार महाबैठकीत

  • Written By: Last Updated:

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 26 तारखेची सभा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या महाविजयाची नांदी असा निर्धार महाबैठकीत व्यक्त करण्यात आला. 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे उद्घाटन त्याचबरोबर इतर कामांचे देखील लोकार्पण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपा (BJP) पुणे शहरच्या वतीने महा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, राजस्थानमधील आमदार केसाराम चौधरी, भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीण अध्यक्ष वासुदेव काळे, शरद बुट्टे- पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजपा अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश चिटणीस ॲड. वर्षा डहाळे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे. पुणे जिल्ह्यासाठी विविध प्रकल्प दिले आहेत. आपले नेते देशाचं नेतृत्व करताना सर्वाधिक काळ प्रवास करत असतात. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता पुण्यातील सभा ही न भुतो न भविष्यती सभा यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया प्रभावीपणे वापरला पाहिजे.‌ विधानसभा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी; विरोधकांचे चुकीचं नॅरेटिव्ह खोडून काढलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तर चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशातील काही महानगरं अभ्यास केला पाहिजे. राजकोट, इंदौर सारख्या महापालिकेत भाजपा सातत्याने निर्विवाद वर्चस्व मिळत आहे. एक विधानसभा पदं पाहिली तर 900 संख्या होते. प्रत्येक कार्यकारीणी पाहिली तर सरासरी एक हजार संख्या आहे. अशा लोकांनी पाच लोकांना आणलं तर ही संख्या 40 हजार होईल. पुणे शहराने अशी आपली ताकद वाढवली पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 130 विधानसभा मतदारसंघात ही अतिशय उत्तम मताधिक्य मिळाले. अजून थोडे प्रयत्न केले तर 160 संख्या पोहोचू शकतो. महाराष्ट्रात महायुतीची कुठेही पिछेहाट झालेली नाही. पश्चिम महाराष्ट्रात देखील 4 जागा महायुती विजयी झाली आहे. आगामी काळात महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतही विजय मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, नियोजनाच्या बैठकीचे स्वरुप हे एवढं मोठं असेल, तर ही बैठक यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. सभा म्हणजे निवडणूक जिंकण्याचं साधन आहे. बिगर भाजपा शासित राज्यात आज आराजक सदृश्य परिस्थिती आहे. केंद्रात पुणे शहराला अतिशय महत्त्वाचे स्थान मिळत आहे. कालच नितीन गडकरी यांनीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय महत्वाचा आहे. मोदीजी येणार म्हटल्यावर पुणेकर मोठ्या उत्साहाने सभेला येतीलच. भाजपा कुठे कुठे पोहोचू शकतो, याचा सर्वांनी विचार करावे. मोदीजी व्यस्ततेतून पुण्याला वारंवार वेळ देतायत. लांबून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी वेळेत सभा स्थानी पोहोचावे, असं आवाहन केलं.

धीरज घाटे म्हणाले की, पुणे शहराची मोठी परंपरा असून, एखाद्या कार्यक्रमापूर्वी नियोजनाची बैठक झाली, की सर्व कार्यकर्ते अतिशय झोकून देऊन काम करुन; तो यशस्वी करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दौऱ्यानिमित्त काही लाख कुटुंबांच्या घरापर्यंत पोहोचता मिळते. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने 100 घरापर्यंत जाऊन निमंत्रण द्यावे.

भारताला धक्का, चीन समर्थक अनुरा दिसानायके होणार श्रीलंकेचे राष्ट्रपती, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

पुण्याच्या मध्यवर्ती भागात ही सभा होत असल्याने ही सभा न भुतो न भविष्यती यशस्वी होईल, अशी भावना व्यक्त केली. तसेच, लोकसभेचा अनुभव पाहता, माननीय मोदीजींची विधानसभा निवडणुकीच्या विजयाची नांदी ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

follow us