PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 26 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार होते मात्र हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आज (29 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन केले आहे. याच बरोबर सावित्रीबाई फुले स्मारकाची पायाभरणी देखील करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये राज्यातील लाडक्या बहीण आणि लाडक्या भावांना नमस्कार करत म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मी विविध विकासकामांच्या उदघाटन करण्यासाठी पुण्यात येणार होतो मात्र मुसळधार पावसामुळे हा दौऱ्या रद्द करावा लागला. त्यात माझं नुकसान झालं कारण पुण्याच्या प्रत्येक कणात देशभक्ती आणि सामाजिक भक्ती आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द झाल्याने माझा मोठा नुकसान झाला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन झाले आहे त्यामुळे याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच भगवान विठ्ठल यांच्या आशीर्वादाने सोलापूरला थेट हवाई संपर्काने जोडण्यासाठी विमानतळाला अपडेट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. विमानतळावरील टर्मिनल इमारतीची क्षमता वाढविण्यात आली आहे तसेच प्रवाशांसाठी नवीन सुविधा निर्माण करण्यात आले आहे त्यामुळे याचा फायदा विठोबाच्या भक्तांना होणार आहे. असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या आठ वर्षात मेट्रोचा एकही खांब उभारण्यात पूर्वीचे सरकार अपयशी ठरले पण आमच्या महायुतीच्या सरकारने पुण्यात अत्याधुनिक मेट्रोचे काम पूर्ण केले. गेल्या सरकारच्या काळात पुण्यासाठी प्लॅनिंग आणि व्हिजनचा अभाव होता मात्र आमच्या सरकारच्या काळात हे होत नाही. आम्ही लोकांसाठी काम करत आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
मोठी बातमी! मल्लिकार्जुन खरगेंची तब्येत बिघडली, भाषण करताना आली भोवळ
तसेच मेट्रोशी संबंधित प्रकल्प असो, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन असो किंवा शेतकऱ्यांसाठी सिंचनाशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे आमच्या सरकारच्यापूर्वी होत नव्हती मात्र आता महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणारे सर्व प्रोजेक्टवर काम होत आहे असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.