मोठी बातमी! मल्लिकार्जुन खरगेंची तब्येत बिघडली, भाषण करताना आली भोवळ
Mallikarjun Kharge : रविवारी जम्मूमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची तब्येत बिघडली आणि भाषणादरम्यान त्यांना भोवळ आली. त्यामुळे काही मिनिटाची विश्रांती घेत त्यांनी पुन्हा एकदा भाषणाला सुरुवात केली.
#WATCH | Jammu and Kashmi: Congress President Mallikarjun Kharge became unwell while addressing a public gathering in Kathua. pic.twitter.com/OXOPFmiyUB
— ANI (@ANI) September 29, 2024
यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आम्ही राज्याच्या दर्जा पुनर्स्थापित करण्यासाठी लढू, मी 83 वर्षांचा आहे, मी इतक्या लवकर मरणार नाही. पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवण्यापर्यंत मी जिवंत राहीन असं ते म्हणाले. ते जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे एका निवडणूक सभेमध्ये बोलत होते.
रिमोट-नियंत्रित सरकार पाहिजे होते
तसेच त्यांनी यावेळीकेंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत या लोकांना कधीही निवडणुका घ्यायचे नव्हते. जर त्यांना निवडणुका घ्याचे असते तर त्यांनी एक-दोन वर्षात निवडणुका घेतले असते मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांना लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून रिमोट-नियंत्रित सरकार चालवायचे होते. असा आरोप देखील त्यांनी या सभेत बोलताना केंद्र सरकारवर केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी तरुणांना काहीही दिले नाही. ज्या व्यक्तीने गेल्या १० वर्षात तुमच्यासाठी काहीच केले नाही तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकतात का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी जनतेला विचारला तसेच जर भाजपचा कोणताही नेता तुमच्यासमोर आला तर त्याला हा प्रश्न विचार असं आवाहन देखील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या सभेत बोलताना केला.
खोटी बदनामी थांबवा अन्यथा …, आमदार आशुतोष काळेंचा विरोधकांना इशारा
केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. आज मतदानाच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अंतिम टप्प्यातील मतदान 3 ऑक्टोबरला होणार असून 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत.