Mallikarjun Kharge : इंडिया आघाडीचे अध्यक्ष ठरले; विरोधी पक्षांच्या बैठकीत खरगेंच्या नावावर शिक्कामोर्तब!

Mallikarjun Kharge : इंडिया आघाडीचे अध्यक्ष ठरले; विरोधी पक्षांच्या बैठकीत खरगेंच्या नावावर शिक्कामोर्तब!

Mallikarjun Kharge : इंडिया आघाडीची धुरा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge ) यांच्या खांद्यावर असणार आहे. कारण इंडिया आघाडीने त्यांना आपले अध्यक्ष म्हणून निवडलं आहे. आगामी लोकसभा निवडणुक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे सत्ताधारी भाजप आणि दुसरीकडे विरोधकांची इंडिया आघाडी चांगलेच तयारीला लागले आहेत.

Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीचा लंडन दौरा आजपासून सुरू

त्यामध्ये इंडिया आघाडीच्या वेगवेगळ्या स्तरावरील बैठकांचे सत्र सुरू असताना, आघाडीची एक व्हर्चुअल बैठक पार पडली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगेंना निवडण्यात आलं. या अगोदर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना या आघाडीचे प्रमुख बनवण्याचे चर्चा होती. मात्र त्यांनी या पदासाठी नकार दिला.

रामाच्या अयोध्येत आलात मग, रिकाम्या हातानं जायचं नाही; पाहुण्यांना मिळणार अनोखी भेट

तसेच ते म्हणाले होते की, या आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा ही काँग्रेसने सांभाळायला हवी. त्यामुळे सर्वपक्षांच्या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यानंतर आता आघाडीमध्ये जागावाटप हा एक महत्त्वाचा टप्पा बाकी आहे. सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

‘तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, CM पदही…’, चित्रा वाघांची ठाकरेंवर जहरी टीका

त्यात आता काँग्रेसवर आणि मलिकाजुन खरगे यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. विरोधकांचा मुख्य चेहरा म्हणून ते भाजप आणि एनडीएच्या समोर उभे ठाकतील. त्यांच्यासमोर इंडिया आघाडीमध्ये मतभेद होऊ नयेत, एकजूट कायम राहावी हे देखील एक मोठा आव्हान असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज