मिलिंद देवरा काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याच्या तयारीत; पक्षप्रवेशासाठी भाजप अन् शिंदेंकडून पायघड्या
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक गणिते लक्षात घेऊन सर्व पक्षीय नेत्यांमध्ये पक्ष बदलाचे वारे सुरु वाहू लागले आहेत. यात आता काँग्रेस (Congress) नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांचाही नंबर लागला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट सोडणार नसल्याचे आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांची उमेदवारी अंतिम असल्याचे स्पष्ट झाल्याने देवरा काँग्रेसला राम-राम करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. (Milind Deora is preparing to leave Congress and join Shiv Sena)
त्याचवेळी देवरा यांना आपल्या पक्षात घेऊन दक्षिण मुंबई मतदारसंघावरील दावा मजबूत करण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजप आणि शिवसेनेत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
दुसऱ्या बाजूला मिलिंद देवरा हे काँग्रेसचे बडे आणि सुसंस्कृत नेते मानले जातात. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यांचे वडील दिवंगत मुरली देवराही काँग्रेसचे दिग्गज नेते होते. तेही याच मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत. शिवाय ते दोनवेळा राज्यसभेवरही निवडून गेले होते. डॉ. मनमोहनसिंह सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. त्यांच्यानंतर मिलिंद देवरा यांनीही 2004 आणि 2009 असे दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तेही डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री राहिले आहेत. त्यांच्या पक्ष बदलामुळे काँग्रेसचेही मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
‘उद्धव ठाकरे सहकाऱ्यांना ‘सवंगडी’ नाही, ‘घरगडी’ समजतात’; मोदींसाठी CM शिंदे पुन्हा भिडले
मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून लढण्याकरिता इच्छुक आहेत. मात्र त्यांचा 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळी शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी एक लाख मतांच्या फरकाने पराभव केला आहे. आता पुन्हा एकदा अरविंद सावंत या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवाय शिवसेनेतील फुटीनंतर सावंत एकनिष्ठ राहिल्याने उद्धव ठाकरे ही जागा काँग्रेसला सोडण्याची शक्यता नाही. यामुळेच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत जाण्याचे जवळपास निश्चित केल्याचे समजते. येत्या दोन-तीन दिवसांत त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
PM मोदींचे वर्षभरापूर्वी सुतोवाच अन् मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये ‘सहा’ हजार कोटींची घट
देवरांसाठी भाजपचीही फिल्डिंग :
गतवेळी शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने महायुतीमध्ये ही जागा मिळावी आपल्यालाच मिळावी असा शिंदेंचा दावा आहे. शिवाय गिरगाव, शिवडी, परळ, लालबाग, वरळी, काळचौकी या भागात मराठी मतांचीही ताकद आहे. यासोबतच शिवसेनेलाही दिल्लीच्या वर्तुळात एक तगडा चेहरा मिळू शकतो. देवरा यांच्या पक्षप्रवेशासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले जात आहे. पण दुसऱ्या बाजूला देवरा यांच्यासाठी भाजपनेही जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावांची या मतदारसंघातून चर्चा सुरु आहे.